रस्त्याच्या कामात मुरूमाऐवजी माती – सा.बा. विभागात भ्रष्टाचाराचा कहर
रस्त्याच्या कामात मुरूमाऐवजी माती – सा.बा. विभागात भ्रष्टाचाराचा कहर
मूल (प्रतिनिधी)मूल-चामोर्शी मार्गाचे डांबरीकरण आणि रस्त्याचे कडेला मुरूम टाकण्यांचे काम सुरू असून, कंत्राटदार मुरूमाऐवजी चक्क शेतातील माती टाकून सायडींग भरण्यांचे काम करीत असल्यांचे उघड झाले आहे. मूल सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालयाचे हाकेच्या अंतरावरील कामाची ही परिस्थिती आहे तर, दुरवरचे काम कोणत्या दर्जाचे असेल याची कल्पनाच न केलेली बरी.
मूल-चामोर्शी
मार्गावर बोरचांदलीचे आजूबाजूला काम सुरू आहे.
डांबरीकरण आणि रस्त्याचे कडेला मुरूमाचे सायडींगचे काम एकत्रीतरित्या एकाच कंत्राटदारामार्फत
केले जात आहे. मागील 10-12 दिवसापूर्वी रस्त्याचे
बाजूला भराईचे काम करण्यात आले. ही भराई मुरुमाची
करणे अपेक्षीत आहे. मात्र कंत्राटदारांनी मूल
शहराच्या जवळील काही भागात लाल रंगाची भिसी, नंतर काही भागात पांढरी भिसी, तर काही
भागात चक्क शेतातील काळी माती टाकून भरण भरल्यांचे दिसून आले.
या
कामावर देखरेख करणारे अभियंता श्री. धांडे यांचेशी त्यांचे भ्रमणध्वनीवरून माहीती घेतली
असता, त्यांनीच कोणत्या ठिकाणी माती टाकली आहे? असा उलट प्रश्न केला. मागील 10-15 दिवसापूर्वीचे हे काम असतांना, त्यांना
जर मुरूमाऐवजी माती कुठे टाकली आहे हे दिसले नसेल तर, ते या कामावर खरेच देखरेख करतात
काय? हा प्रश्न निर्माण होत आहे. सदरर्हु कामात
मुरूमच टाकणे मंजूर असल्यांचे त्यांनी मान्य केले, मात्र हे काम किती रूपयाचे आहे?
या प्रश्नाचे थेट उत्तर न देता, डांबरीकरण आणि रस्त्याचे कडेला मुरूम टाकण्यांचा काम
एकत्रीतच असल्यांचे त्यांनी पब्लिक पंचनामाशी बोलतांना सांगीतले. भिसी माती, शेतातील माती काढून, मुरूम न टाकल्यास,
या प्रकरणाची वरीष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यांचीही काही ग्रामस्थानी तयारी दर्शविली
आहे.
अंदाजपत्रक सादर करताना आणि कंत्राट देताना कामासाठी लागणारे साहित्य कुठून आणायचे हे निश्चित केलेले असते. मात्र कंत्राटदार निर्धारित ठिकाणावरून मुरुमाची उचल न करता, टाटा ट्रस्टच्या माध्यमातून ज्या विहिरीचे खोदकाम चालू आहे, तेथे निघालेली माती हे रोडच्या सायडिंगसाठी वापरत असल्याचे ही विश्वसनीय वृत्त आहे
कार्यालयाच्या हाकेच्या अंतरावरील हा बोगस काम सा.बा. अधिकाऱ्यांच्या नजरेतून सुटला कि, यात काही अर्थकारण याचीही खमंग चर्चा आहे.
पब्लिक पंचनामा च्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सहभागी होण्यासाठी क्लिक करा





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!