नामांकित मासिकांच्या वार्षिक वर्गणीवर ३५ टक्के सवलत योजना
लॉक डाऊन दरम्यान वाचकांना ई – मॅगझीन अगदी मोफत
जिल्हा - प्रतिनिधी ( विलास मोहिणकर )
चंद्रपूर : - दिल्ली प्रेसच्या वतीने वाचन संस्कृती कायम टिकविण्याकरिता चंपक, सरिता, गृहशोभिका, मनोहर कहानियाँ, मोटरिंग वर्ल्ड यासारख्या प्रसिध्द मासिकांच्या सभासदत्वासह आपले व आपले मुलांच्या मनोरंजनाकरिता वार्षिक वर्गणीवर ३५ टक्के सवलत देण्यात येणार येत आहे. सोबतच लॉक डाऊन दरम्यान ई -मॅगझीन अगदी मोफत देण्याची योजना आखण्यात आली असल्याची माहिती दिल्ली प्रेसचे अधिकृत प्रतिनिधी सुरेश डांगे यांनी दिली आहे.
आपल्या आवडत्या मासिकांची वार्षिक वर्गणीची रक्कम जमा करण्याकरिता आपणास लिंक देण्यात येईल. त्या लिंकद्वारे पेमेंट करताना आपल्या प्रमोशनल कोड नोंदवायचा आहे. एकदा सभासदत्व घेतल्यानंतर वाचकानी निवड केलेल्या मासिकांच्या पीडीएफ मोफत उपलब्ध करून देण्यात देईल. टपाल सेवा सुरु होताच मासिकांची छापील प्रत पाठविण्यात येईल. टपाल सेवा सुरु होईपर्यंतचे पीडीएफ अंक मोफत असतील तर छापील प्रत ज्या तारखेला वाचकांना पोहचेल तेव्हापासून वार्षिक वर्गणी सुरु होईल.
या योजनेच्या सविस्तर माहितीसाठी दिल्ली प्रेसचे अधिकृत प्रतिनिधी सुरेश डांगे यांचे भ्रमणध्वनी ८६०५५९२८३० किंवा ९८३३१५१५४५ वर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!