शाळेत क्वारंटाईनमध्ये असलेल्या युवतीचा विनयभंग #corona
ब्रह्मपुरी (प्रतिनिधी)तालुका मुख्यालयापासून 12 किमी अंतरावर असलेल्या नान्होरी जिल्हा परिषदेच्या शाळेत इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनमध्ये असलेल्या युवतीने गावातीलच एका इसमाने विनयभंग केल्याची तक्रार ब्रम्हपुरी पोलिस ठाण्यात दि 25 मे रोजी दाखल केली आहे. त्यामुळे तालुक्यात खळबळ माजली असून क्वारंटाईन व्यक्तीच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. क्वारंटाईन व्यक्ती कितपत सुरक्षित आहेत आणि प्रशासन त्यांची कितपत चांगल्या प्रकारे काळजी घेत आहे हे वरील तक्रारीवरून समजून येते.
प्राप्त माहितीनुसार सदर युवती दि 15 एप्रिल पासून पुणे येथून आली असल्याने गावातील शाळेत क्वारंटाईन आहे प्राप्त तक्रारीनुसार सदर युवती दि 24 एप्रिल रोजी सायंकाळी साडे सात वाजता शाळेतील नळावर हात-पाय धूत असताना आरोपी काकाजी प्रधान शाळेच्या संरक्षक भिंतीवरून उडी मारून आतमध्ये प्रवेश केला आणि हात पकडून अश्लील चाळे व शिविगाळ केली.
यावेळी सदर युवतीच्या ओरडण्यामूळे विलगीकरणात असलेल्या बहिणीने व ईतर लोकांनी युवतीच्या दिशेने धाव घेऊन आरोपीला हटकले व ग्रामपंचायत चपराशी याने आरोपीला शाळेच्या बाहेर काढले त्यांनतर आरोपीने पळ काढला.
काही वेळाने सदर घटनेची माहिती चुलत भावाला व सरपंच यांना माहिती होताच त्यांनी तात्काळ शाळेकडे धाव घेऊन घडलेल्या प्रकरणाची शहानिशा करून आरोपीच्या घराकडे गेले असता आरोपी काकाजी प्रधान याने चुलत भावाला ग्लासने मारहाण केली त्यामुळे चुलत भाऊ जखमी झाला असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
याधारे ब्रम्हपुरी पोलिस ठाण्यात आरोपी काकाजी प्रधान यांच्याविरोधात कलम 294,323,354,506 अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास ब्रम्हपुरीचे उपविभागीय पोलिस अधिकारी मिलिंद शिंदे करीत आहेत.



अश्या प्रकारे विनयभंग होत असतील तर मुली उपचार घेण्या पेक्षा कारण जवळ करतील.
उत्तर द्याहटवा