वंचित बहुजन आघाडी तालुका चिमूर च्या वतीने गरजूंना केले मास्क वितरीत
पळसगाव - प्रतिनिधी ( विकास खोब्रागडे )
पळसगाव : - दि.२३ मे २०२० ला मिरची कटाई सातरा मौजा शंकरपूर इथे वंचित बहुजन आघाडी तालुका चिमूर च्या वतीने वं. ब.आ.पूर्व विदर्भाचे प्रमुख समन्वयक आदरणीय डॉ.रमेशकुमार गजभे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच वं. ब.आ.चे तालुका चिमूर चे अध्यक्ष स्नेहदिप खोब्रागडे यांच्या नेतृत्वाखाली व शंकरपूर-डोमा जि. प.क्षेत्राचे प्रमुख शैलेशजी गायकवाड यांच्या पुढाकारातून मिरची कटाई सातऱ्यावरती काम करणाऱ्या मजूर वर्गाला मास्क चे वितरण करण्यात आले.
या प्रसंगी डॉ. रमेशकुमार गजभे यांनी मास्क कशा प्रकारे वापरायचा,मास्क वापरण्याचे फायदे काय आहेत या विषयावर विस्तृत मार्गदर्शन केले तद्नंतर स्नेहदिप खोब्रागडे यांनी उपस्थित मजूर वर्गाला कोरोना विषाणू चा संसर्ग कशाप्रकारे टाळता येईल व भविष्यात आपण कुठली खबरदारी घेतली पाहिजे या संदर्भात मार्गदर्शन केले.
शंकरपूर तसेच परिसरातील मिरची कटाई चे सातरे हे लॉकडावुन मुळे जवळपास २ महिने बंद राहल्याने मजूर वर्गाला ऐन उन्हाळ्यात रोजगार मिळणे बंद झाले होते.
या समस्येची दखल घेत शैलेशजी गायकवाड यांनी तालुका अध्यक्ष स्नेहदीप खोब्रागडे याना दूरध्वनीवरून सूचना दिली आणि तात्काळ तहसील कार्यालय चिमूर गाठून तहसीलदार साहेब याना निवेदन दिले आणि या विषयावर चर्चा केली आणि कुठलाही विलंब न लावता ५ दिवसामध्ये हा प्रश्न निकाली काढला.या बद्दल उपविभागीय अधिकारी साहेब, तहसीलदार , कृषी अधिकारी साहेब यांचे मनापासून धन्यवाद.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!