सम्यक आणि संयम काळाची गरज
सम्यक आणि संयम काळाची गरज
विशेष लेख
जितेंद्र पेंदाम
पवनपार तह. सिंदेवाही जिल्हा-चंद्रपूर
.........
सम्यक आणि संयम वर्तमान काळाची गरज आहे. ही वाणी आहे ख्रिस्तीपुर्व ५६३ साली वैशाख पोर्णिमेला जन्मलेल्या जगत गुरू सिद्धार्त गौतम बुद्धाची .जी आजच्या घडीला तंतोतंत लागू पडते .जग हे दु:खाने भरलेलं आहे. शांती साठी शोधत आहे. परंतु शांती प्राप्त होत नसल्याने मानव जात सैराट चालत आहे. गौतम बुद्धांना दु:ख काय आहे.? दु:ख कसं आहे.? दु:खाच्या पलीकडे काय आहे? मानवाचं हित कशात आहे? प्रचलीत आणि विस्थापीत साधने दु;खातुन बाहेर काढु शकतो.?
समस्या निर्माण झली तर समाधान असेलच हा विचार गौतम बुद्धाला औत्सुकाचा वाटला. दु:खाला विलिन करता येइल.संकटातुन ,दु;खाच्या पल्याड जाता येईल,दु;खाला जवळुन पाहता येईल.यारखे विचार सिद्धार्त गौतम बुद्धाला अस्वस्थ करीत होते.
दु;खाचा निवारन करणया करीता गौतम बुद्धाला अनेक संकटांना सामोर जावं लागलं. अनेक खडतर तपश्रर्या करावी लागली. संसार त्याग करावा लागला. त्यांच धेय्य होत.मानव जन्माचं लक्ष काय. मानव जन्माचं अंतीम धेय्य, अंतीम साध्य हे त्यांना शोधायचं होतं.
ज्या महात्म्याकडे जेवढी विद्या ,जेवढी साधने होती ती अल्प काळात साध्य करून या ही पलीकडे काय आहे असं गौतम बुद्ध विचारताच सर्व रूषी ,महात्मे आमच्या कडे जेवढं होत तेवढं दिलं .
सर्व साधने गौतम बुद्धांनी पारंगत केली होती. समाधान मात्र मिळत नव्हता.त्यांनी प्रयत्नाला दोषी ठरवलं नाही. दु:खाच्या मुळात जायचं होतं म्हनुन त्यांनी प्रयत्न सोडला नव्हता. असाध्य ते साध्य करीशी सायास ।कारन अभ्यास तुका म्हणे।। निरतंर साधनेच्या जोरावर ,प्रचंड मनोबलावर अखेर सिद्धार्त गौतम बुद्धांना मार्ग गवसला.जो संम्पुर्ण जगाला प्रकाशमान केलं.
दया, क्षमा, शांतीची प्राप्ती झाली.
दु:खाचं मुळ कारन समजलं. जे त्यांना प्राप्त झालं त्यानी डोळस पद्धतीनं, अधश्रद्धेच्या पलिकडे जावुन मांडलं ज्यांची आजच्या परीस्थितीत आवश्यकच नाहीतर काळाची गरज आहे.
त्यांनी दिलेला प्रद्न्या, शील करूणा हा महामंत्र जगानं स्विकारलं.
गौतम बुद्धांनी अष्टांगीक मार्गांचा स्विकार केला. ज्यात सम्यक दृष्टी,सम्यक संकल्प, सम्यक वाणी,सम्यक कर्मान्त, सम्यक आजिविका, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती, सम्यक समाधी यांचा समावेश आहे.
सम्यक दृष्टी म्हणजे अनुभवाचा आधार नसलेला कल्पनेपासुन दुर राहने.सम्यक संकल्प म्हणजे आपले धेय्य, कर्म, कल्यानकारी व्हावं. सम्यक वाणी मध्ये स्पष्टता हवी.यासारखे मानवाच्या जिवनाला आवश्यक मार्गदर्शक त्तत्वे सांगीतली आहेत.
गौतम बुद्धांनी सांगितलेल्या अष्टाग मार्गाची गरज आज निर्माण झाली आहे.
कोरोना सारख्या महामारीत संम्पुर्ण जग लढत आहेत. भारतही प्राणपनाने विजयाच्या संकल्पाने लढत आहे.
आरोग्य यंत्रणा, आरोग्य कर्मचारी कोरोनाच्या महामारीतुन मार्ग काढनारे सेवक, तुमच्या आमच्या आणि पर्यायाने सर्वासाठी कधी प्रेमाने तर कधी दंडुकशाहीचा मार्ग अववंबुन रक्षन करनारे पोलीस घराचे त्याग केलेले आहेत. सर्वच कोवीडवर लढनारे कर्मचारी ,सेवक सुखी संसारावर पानी फेरलं आहेत.
या गंभिर यमयी सिद्धार्त गौतम बुद्धाच्या जयंती निमित्य बुद्धांनी सागितलेल्या अष्टांगीक मार्गाचा अवलंब करूया.
या परीस्थिती मध्ये सम्यक आणि संयम ही आजची गरज आहे
ज्यात आपलंच हित आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!