बंधारा दुरुस्तीचे निकृष्ट काम?
बंधारा दुरुस्तीचे निकृष्ट काम?
लाखो रुपयांचा अपहार; कंत्राटदारावर कारवाईची मागणी.
पोंभुर्णा (विजय ढोगे)
तालुक्यातील मौजा घनोटी (विहिरगाव) येथे सन 2019 ते 2020 या मागील वर्षात गावाजवळील बंधारा दुरुस्ती करिता शासनाकडून अंदाजे 4 लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला. मात्र येथील कंत्राटदाराने या बंधारा दुरुस्तीचे काम डागडुजी करून हजारो रुपायातच निकृष्ट दर्जाचे काम करून मोकळे झाले. तरी संबंधित कामाची योग्य ती सखोल चौकशी करण्यात येऊन संबंधित कंत्राटदारांवर कारवाई करण्यात यावी अशी विनंती ग्रामस्थांनी केली आहे.
सदर बंधाऱ्याची डागडुजीचे काम करताना नियम धाब्यावर बसवून काम निकृष्ट करून शासनाकडून प्राप्त झालेली उर्वरित रक्कम हि कंत्राटदार व अभियंता यांनी मिली भगत करून शासनाची फसवणूक केली आहे.
शासनाच्या या आलेल्या पैशाचा अपहार करून बंधाऱ्याचे काम मात्र जैसे थे च असल्याचे दिसून येत आहे. या बंधाऱ्याची चौकशी करून शासनाची दिशाभूल करून निकृष्ट काम करून शासनाचा लाखो रुपये अपहार करणाऱ्या कंत्राटदाराची वरिष्ठांकडून सविस्तर चौकशी करून संबंधित कंत्राटदाराला काळ्या यादीत नाव टाकावे अशी मागणी होत आहे.
यासंदर्भात शाखा अभियंता काकडे यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!