लॉकडाऊन मध्ये दारूची ट्रक आली कशी?


मूल (प्रतिनिधी)

लॉकडाऊनमध्ये पोलिसांचा कडक बंदोबस्त असतांना, मूल शहरात दारूची ट्रक आली कशी आणि ट्रकभर दारूचे वितरण झाले कसे असा प्रश्न नागरीकांत निर्माण झाला आहे. दिनांक 6 मे च्या पहाटे मूल शहरातील हेटी परिसरात दारू भरलेले एक ट्रक आले, लगेच टु-व्हिलरने ‘माल’ परस्पर सप्लाय पण झाला. याची खमंग चर्चा मूल शहरात सुरू आहे.
राज्यात कोरानामुळे लॉकडाऊन झाले. यानंतर, जिवनाश्वयक वस्तू वगळता इतर दुकाने बंद ठेवण्यात आली, यात दारूची दुकानेही होती. दारू दुकाने बंद झाल्यांने, तेथून अवैद्य होणारा पुरवठा थांबला आणि जिल्हयात खऱ्या अर्थाने दारूबंदी दिसू लागली. मात्र केंद्र सरकारने सुट दिल्यानंतर, राज्यसरकारने दोन दिवसापूर्वी दारूची दुकाने सुरू केली. आणि चंद्रपूर जिल्हयात अवैद्य दारूपुरवठा सुरू झाल्यांचे चित्र आहे. कोरोणाच्या पार्श्वभूमीवर अशी अवैद्य दारू जिल्हयात येणे आणि वाटप होणे, ही गंभीर बाब असून, या दारूसोबत जिल्हयात कोरोणाही येण्याची भिती नागरीकांत आहे.

पोलिसांच्या कडक बंदोबस्तात दारू भरलेली ही ट्रक आली कशी? कुठून आली? हा शोधाचा विषय झाला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!