मोटेगाव ईथुन नेरी-चिमुर परीसरात होत असते अवैध दारू पुरवठा
चिमूर - तालुका प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )
चिमूर : - चंद्रपूर जिल्हयात दारू बंदी असल्यामुळे मद्यशौकीन त्यावर पर्याय शोधतच असतात .आता लॉकडाऊन मुळे विदेशी, देशी मद्य बाहेर जिल्ह्यातून येत नसल्यामुळे मद्यशौकीनाना मोहफुलाच्या दारूचा आधार घ्यावा लागत आहे.नेरी या गावामध्ये मोहाची दारू मोठ्या प्रमाणात विक्री करीत आहे.एका छोट्या दारू विक्रेता कडून माहीती घेतली असता त्यांनी मोठ्या दारू तस्कराची माहीती दिली.नेरी व चिमुर परीसरात मोटेगावच्या दारू तस्करा बद्दल माहीती दिली.तो या परीसरात दारू पुरवीत असतो व सगळी जवाबदारी तेच साभाळत असते.बऱ्याच दिवसा पासुन हे दारू तस्करी करीत आहे.
एकीकडे लॉकडाऊन असल्याने सर्व मजूर वर्गाचे कामे बंद आहे त्यात अडचणीत भर टाकण्यासाठी ही दारू विक्री मोठ्या आर्थिक संकटात असलेले कुटुंब आणि ही मोहाची दारू म्हणजे जवळचे पैसे संपले की उपासमार येणार.लॉकडाऊन च पालन करण्यासाठी पोलीस प्रशासन प्रयत्न करीत आहे परंतु या अवैध दारू विक्रीकडेही लक्ष देण्याची गरज आहे .कालच चंद्रपूर ला दोन दिवसा अगोदर कोरोना रुग्ण आढळला ही मद्य विक्री ही कोरोना प्रसाराचे कारण बनू शकते दारू सोबत कोरोना घरी येऊ शकतो ही बाब गंभीर आहे .पोलिस प्रशासनाने याकडे विशेष लक्ष देऊन ही दारू विक्री थांबवून याकडे गंभीरपणे लक्ष देण्याची गरज आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!