कोरोणात जीवाची बाजी लावून लढताहेत अंगणवाडी सेविका
कोरोणा विषाणुच्या पार्श्वभूमीवर जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य बजावत आहे अंगणवाडी सेविका
शंकरपूर (जगदीश पेंदाम)
देशात covid-19 विषाणुसी सर्व आरोग्य यंत्रणा लढा देत असताना दुसरीकडे एकात्मिक बाल विकास प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या ग्रामीण भागातील तालुक्यातील 287 अंगणवाडी पैकी 265 कार्यरत अंगणवाडीच्या अंगणवाडी व मदतनीस भविष्यातील सदृढ पिढी निर्माण होऊन बलशाली भारतासाठी आघाडीवर राहून लढा देताना दिसत आहे..
प्रत्यक्ष गरोदर माता, स्तनदा माता, व बालकास परिपूर्ण पोषण आहार मिळावे यासाठी उन्हातानात ते प्रत्यक्ष घरोघरी जाऊन सुरक्षितपणे काम करीत आहे देशात बालमृत्यू ,कुपोषण ही गंभीर समस्या आहे संपूर्ण देशात लाखो मृत्यू फक्त पोषण आहाराच्या कमतरतेमुळे होत असतात याकरता गरोदर माता स्तनदा माता व 0 ते 6 वयोगटातील बालकांच्या आरोग्याच्या प्रश्न निर्माण होऊ नये व त्यांच्या पोषण आहार वितरण मध्ये लाँकडाँवुन मुळे कोणतीही अडचण निर्माण होऊ नयेत याकरिता प्रत्यक्ष लाभार्थ्याच्या घरपोच आहार भेटावे ह्यासाठी शासनाने एकात्मिक बालविकास प्रकल्प अंतर्गत अंगणवाडी सेविका, मदतनीस परिश्रम घेतले आहे.
लाभार्थ्याला पोषण आहाराचे वाटप करणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे काम हे महत्त्वाचे असून कमी पगारात कुठले प्रकारे आढेवेढे न घेता काम करणारे अंगणवाडीसेविका तालुक्यात कोरोनाचा पार्श्वभूमीवर महत्त्वाचा घटक बनत आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!