कोरोना कोविड - १९ या विषाणू मुळे व सोशल डिस्टन्स च्या पालनामुळे मातंग समाजावर आली उपासमारीची पाळी
उपविभागीय अधिकारी यांना दिले निवेदन
जिल्हा - प्रतिनिधी ( विलास मोहिणकर )
चंद्रपूर : - दिनांक.१८/०५/२०२० चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील नेरी येथील मातंग समाज यांनी कोरोना कोविड - १९ या विषाणू मुळे सोशल डिस्टन्स च्या सरकार च्या धोरणामुळे व पालनामुळे मातंग समाजावर उपासमारीची पाळी आली आहे.लग्न सोहळ्याची परवानगी शासन देत असून वादयाची परवानगी का दिली जात नाही आज भारतामध्ये सर्वत्र दि.२२ मार्च २०२० ला लॉक डाऊन घोषित केले. संचारबंदी लावण्यात आली.कलम १४४ लागू करण्यात आली.
या संचारबंदी मध्ये अनेक गोर - गरीब जनता त्यांना अन्न विना जीवन जगावे लागले असून याकडे दुर्लक्ष केले जात आहे.आज या लॉक डाऊन ला २ महिने उलटुन गेली असूनही मातंग समाजाच्या हाताला काम नाही. ते लग्न सोहळ्यात वादय वाजवून पैसे कमवित असतात व त्यावर वर्षभर त्यांच्या परिवाराचा उदरनिर्वाह केला जातो. आज लग्न सोहळ्यात वादयाला परवानगी मिळत नसल्याने मातंग समाजावर उपासमारीची पाळी आली आहे.याकडे शासनाने लक्ष देऊन आर्थिक सहकार्य करावे याकरीता पालकमंत्री , जिल्हाधिकारी , व उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आली.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!