पोंभुर्णा येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन.




पोंभूर्णा (प्रतिनिधी)
डाॕ. आनंदरावजी चांदेकर पोंभुर्णा यांच्या ७५ व्या वाढदिवसाचे औचीत्य साधुन पोंभुर्णा येथील चिंतामणी महाविद्यालयात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.  आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबीराला लाकडाऊन च्या काळामध्येही कोरोनाच्या विषाणू ला  न घाबरता सर्व नियमाचे पालन करत नागरिकांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला.
त्या मध्ये एकूण 55 रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्तदान महादान शाखा पोंभुर्णा यांच्या वतीने या शिबीराचे आयोजन करण्यात आले, या मध्ये जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली या रक्तपेढी चे प्रमुख डाॕ.ताराम आणि त्यांची संपुर्ण टिम चे योगदान मिळाले. त्या बद्धल सर्व रक्तदात्याचे तसेच रक्तदान शिबीराला सहकार्य करणारया सर्व नागरिकांचे मनःपूर्वक आभार रक्तदान महादान तसेच  चांदेकर परिवारांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!