चिमूर पोलिसांची मोहफुल हातभट्टीवर धाड



जिल्हा - प्रतिनिधी ( विलास मोहिणकर )

चंद्रपूर : - दि. २९/०५/२०२० ला सोनेगाव बेगडे जंगल परिसरात हातभट्टी मोहफुलदारू चा साठा मोठया प्रमाणात साठा असल्याची माहिती पोलीस निरीक्षक स्वप्नील धुळे पोलीस स्टेशन चिमूर यांना माहिती मिळाल्याने त्यांनी पोलीस पथक व होमगार्ड यांना सोबत घेऊन सोनेगाव बेगडे चा जंगल परिसर पूर्णपणे पिंजून काढून पाणी वाहणाऱ्या पाठाच्या भागात दोन ठिकाणी हातभट्टी मोहफुलदारू चा सडवा मोठया प्रमाणात एकूण ८,२२,००० रुपयांचा साठा मिळून आल्याने दोन आरोपिंवर कारवाही करण्यात आली.


 व सदरची कारवाही पो.नि. स्वप्नील धुळे यांचे मार्गदर्शनात पोहवा विलास सोनूले, विलास निमगडे , ना.पो.शी. किशोर बोढे, पो.शी. सचिन गजभिये , विनायक सरकुंडे, सतीश झिलपे, भरत गोडवे,शैलेश मडावी, शंकर बोरसरे , शरीफ शेख , होमगार्ड राजू कामडी, प्रमोद बनकर, राजू चौधरी, रवी गायकवाड, अतुल नागपुरे, कवडू दिघोरे यांनी पार पाडली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!