मुल येथे आरोग्य सेवेतील कोरोना योध्दांचा सत्कार



मूल (अमित राऊत)
त्यागमुर्ती रमाबाई भिमराव आंबेडकर यांच्या स्मृतीनिमित्ताने विषमता निर्मुलन दल, मूल व समता परिषद, हज. टिपू सुल्तान फाऊंडेशन मूल यांचे विद्यमाने उपजिल्हा रुग्णालय मूल येथे कोरोणा विषाणूच्या महामारीत मोलाचे योगदान देऊन लढा देत असलेल्या सर्व डाॅक्टर्स, नर्स तसेच सर्व कर्मचारी वर्गाचे शिल्ड व पुष्पगूच्छ देऊन गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती चंद्रपूर येथिल सामाजिक कार्यकर्ता व बालरोग तज्ञ डाॕ. अभिलाषा गावतूरे उपस्थित आहे त्यांनी डाॕ. बाबर साहेब यांचा गौरव केला सोबतच डाॕ. तिरथ उराडे, डाॕ. इंदुरकर, डाॕ. रेवतकर यांना व सर्व कर्मचाऱ्यांना गौरविण्यात आले.
यात मा. शशिकला गावतूरे, मा. हिरालाल भडके सर, मा. विजय लोनबले सर, इंजि तौसिफ सैय्यद, मा. कूनघाडकर सर, मा. बबिताताई गेडेकर, मा. राकेश मोहूर्ले, मा. भारती कांबळे मॕडम, मा. अल्का मेंढे, मा. मोरे सर, मा. दुर्गे सर, मा. सिमा चिकाटे, तसेच इतर सेवाभावी सामाजिक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित आहेत.
कोरोना नियंञण आरोग्य विभाग मूलचे सर्व नागरीकांकडून त्यांच्या कार्याचे खूप अभिनंदन केल्या जात आहे.
सर्वानी घरीच राहून सूरक्षितता बाळगून स्वतःची काळजी घ्यावी अशी जनजागृती करण्याचे यावेळेस सांगण्यात आले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!