गडचिरोली झाडीबोली साहित्य मंडळातर्फे शासनाला २१००० रू. ची सहयोग निधी...

वृत्त.. ....
.....गडचिरोली जिल्हा झाडीबोली साहित्य मंडळातर्फे कोरोना प्रकोप निवारण्यासाठी २१००० रू. सहयोग निधी मदत.....



देशभर कोरोना विषाणू चा प्रकोप सुरू असून हे संकट निवारण्यासाठी मान. मुख्यमंत्री यांच्या आवाहनास प्रतिसाद देत गडचिरोली झाडीबोली साहित्य मंडळ जिल्हा शाखेच्या वतीने २१००१ रू. ची सहयोग निधी देण्यात आली. प्रस्तुत राशी मंडळाचे वतीने जिल्हाध्यक्ष डाॕ. चंद्रकांत लेनगुरे ,उपाध्यक्ष कवी विनायक धानोरकर , सहसचिव संजीव बोरकर यांनी जिल्हाधिकारी दिपक सिंगला यांच्याकडे सूपुर्द केली. ज्येष्ठ साहित्यिक बंडोपंत बोढेकर , ज्येष्ठ कवयित्री कुसूमताई अलाम , जिल्हा शाखेचे सचिव कमलेश झाडे, डाॕ. प्रविण किलनाके,भोजराज कान्हेकर , प्रमोद राऊत, मारोती आरेवार , जितेंद्र रायपुरे,प्रमोद बोरसरे, सौ. मालती सेमले,सौ. प्रमिला अलोणे, पुरूषोत्तम ठाकरे आदींनी निधी संकलनासाठी सहकार्य केले. ह्या कार्याचे जिल्हाधिकारी दिपक सिंगला यांनी कौतुक करून मंडळास शुभकामना दिल्यात. गेल्या तीन वर्षात झाडीबोली साहित्य मंडळाच्या जिल्ह्यात साहित्य शाखा स्थापन केलेल्या असून ह्या जिल्हा शाखेच्या वतीने आजवर विविध विषयावर कवीसंमेलने, साहित्य कार्यशाळा तसेच मौशीखांब येथे डिसेंबर महिन्यात झाडीबोली साहित्य संमेलनाचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!