गाव सुरक्षा रक्षक कमिटी गदगाव व पोलिस निरीक्षक स्वप्नील धुळे यांच्या सहकार्याने कोरोना या महामारीवर मात करण्यासाठी गदगाव पूर्णपणे सज्ज




जिल्हा - प्रतिनिधी ( विलास मोहिनकर )

चिमूर : - संपूर्ण देशातील कोरोना या संसर्गजन्य रोगाची वाढती  व राज्यातील आकडेवारी बघता महामारी लक्षात घेता देशात ज्याप्रमाणे लॉकडाऊन करण्यात आले .
तसेच महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार जिल्हा बंदी करण्यात आली त्याचप्रमाणे गदगाव तह.चिमूर जिल्हा.चंद्रपूर येथील ग्रामपंचायत बॉडी यांनी रोगाची दक्षता बाळगता गाव वासीयांकडून गावात गाव बंदी करण्यात आलेली आहे व गावातीलच नवयुवकांना सुरक्षा रक्षक म्हणून जीमेदरी सोपवली असून त्यांचे मार्फत गावातील लोकांची सुरक्षा बाळगण्यात येत आहे व रोगाची लागण होऊ नये यासाठी जनजागृती करण्यात येत आहे. तसेच बाहेरून गावात येणार्यांना प्रवेश बंद करण्यात आलेला आहे.
   
ग्रामपंचायत कार्यालय गदगाव यांचेकडून गावातील सर्व कुटुंबांना साबण वाटप करण्यात आल्या, गावाची स्वच्छता करण्यात आली, गावात फवारणी करण्यात आली, गावात कोरणाबाबद्दल सूचना पत्रके व उपाययोजना बॅनर लावण्यात आले.
    या गावबंदीसाठी प्रशांतभाऊ डवले यांनी एक नवी चालना देऊन गावातील युवक मित्रांना सोबत घेऊन गावाची रक्षा करण्याचे काम हाती घेतले आहे.
   
तसेच पोलीस स्टेशन चिमूर यांचे पण मोलाचे सहकार्य मिळत आहे व आमचे पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक  स्वप्नीलजी धुळे साहेब यांची तालुक्यातील शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी खूप चांगले प्रयत्न सुरू आहेत त्यांच्या या कामगिरीला व पोलीस प्रशासनाला मनाचा मुजरा.
    त्याचप्रमाणे गाव कोरोना दक्षता कमिटी स्थापन करण्यात आली असून त्यांचेपन खूप सहकार्य आम्हाला लाभत आहे. गावातील सरपंच धनराजजी डवले साहेब'सचिव वैजनाथजी राठोड साहेब,तलाठी दडमल साहेब,अंगणवाडी क्र.१ सेविका सौ.नलूताई नागदेवते ,क्र.२ सेविका वनमालाताई झाडे,आरोग्य सेविका वैशालीताई दातीर,आशा वर्कर सौ.मीनाताई काळे, तुकारामजी गोहणे शिपाई ग्रा.पं.गदगाव.

गाव सुरक्षा रक्षक कमिटी गदगाव

१) प्रशांतजी डवले
२) रोशनजी शंभरकर
३) जनार्धनजी सातपुते
४) दिनेशजी शंभरकर
५) चिरागजी शंभरकर
६) गजाननजी दांडेकर
७) लक्ष्मणजी झाडे
या सर्वांच्या सहकार्याने गावाचा कोरोना या रोगापासून रक्षा केली जात आहे व यांच्यापासून गावाची निस्वार्थीपणाने सेवा केली जात आहे.
    यांच्या या निस्वार्थ सेवेचे सर्व गावकऱ्यांनी मनभरून कौतूक केले असून धन्यवाद मानले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!