सचार बंदी मुळे किराणा व्यवसायीक जीवनावश्यक वस्तूवर दरा पेक्षा जास्तीचे पैसे घेऊन मोठ्या प्रमाणात ग्राहकांची करीत आहेत लूट



शासनाने याकडे दुर्लक्ष

जिल्हा - प्रतिनिधी ( विलास मोहिनकर )

चिमूर : - जगभरात सर्वत्र थैमान घालणाऱ्या या विषाणूंजन्य कोरोना Covid - 19 वायरसमुळे हजारोंच्या संख्येने लोकांना विश्वात आपला जीव गमवावा लागला आहे. व दैनंदिन या महामारीमुळे मृतकांच्या आकडेवारीत वाढ होत असल्याने या कोरोना आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आज संपूर्ण  देशभरात २१ दिवसाची संचारबंदी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केली. परन्तु संचारबंदी च्या फक्त काही दिवसामध्ये किराणा व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांनी   जीवनावश्यक वस्तूच्या किंमतीत आपल्या मनमर्जीने वाढ करून जनतेची लूट करीत आहे. याचा सर्वात मोठा फटका गोरगरीब, शेतकरी, शेतमजुरांना, सहन करावा लागत आहे.
२१ दिवसाच्या सचार बंदी मुळे रोजमजूरदार व शेतकरी तसेच शेतमजूर या लोकांची कामे बंद झाली आहे.या लोकांना आपला उदरनिर्वाह कसा करायचा हा प्रश्न सचारबंदी मुळे निर्माण झाला आहे. देशात व राज्यात या कोरोना आजाराचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी म्हणून केंद्र व राज्य सरकारने कलम १४४ संचारबंदी जाहीर केली या बंदी मध्ये गोरगरीब शेतकरी शेतमजूर व जनतेची गैरसोय होऊ नये म्हणून जीवनावश्यक वस्तूला काही अटींवर सवलत देण्यात आली.
संचारबंदी मध्ये जीवनावश्यक वस्तूचा तुटवडा कमी न पडण्यासाठी प्रशासनाने जीवनावश्यक वस्तूची वाहतूक करणाऱ्या वाहनांना मुभा दिली. संचारबंदी लागू करत असताना प्रशासनाने किराणा दुकानात जीवनावश्यक वस्तूवर दरापेक्षा जास्त किमतीने मालाची विक्री केली जात आहे. काळाबाजारी करणाऱ्या किराणा दुकानदारावर कडक कारवाई करण्याचे निर्देश  सुद्धा दिले परन्तु संचारबंदीच्या पहिल्याच आठवड्यात किराणा व्यावसायिक हे ग्राहकांकडून जीवनावश्यक वस्तूवर जास्तीत जास्त पैसे घेऊन काळाबाजारी पद्धतीला सूरुवात झाली आहे.या जीवनावश्यक वस्तू  खाद्यतेल , साखर,रवा , दुग्धजन्य पदार्थ दाळ व  इतर वस्तूच्या किमती पेक्षा जास्त किमतीत वस्तू विकत आहे व  यामुळे जनतेची फसवणूक मोठ्या प्रमाणात होत आहे आणखी संचारबंदीचे अजून १४ , १५ दिवस बाकी आहेत अशीच परिस्थिती राहिली तर या वस्तू पूर्वी पेक्षा दुप्पट दराने विक्री होणार या भीतीने दुकानांमध्ये लोकांची गर्दी निर्माण होत आहे.उपलब्ध असलेला साठा व ग्राहकांचा कल बघता किराणा व्यावसायिक आपला आर्थिक फायदा करून घेण्यासाठी स्वतःचे आवश्यकेनुसार वस्तुच्या किंमतीत वाढ करून घेत आहेत    प्रशासनाने या किराणा व्यावसायिकांना आपल्या दुकानात ग्राहकांमध्ये अंतर राखून व योग्य त्या भावात वस्तूची विक्री करण्याचे स्पष्ट आदेश दिले असताना आमच्या चिमूर तालुक्यात याच्या उलट चित्र निर्माण झाले आहे या कडे प्रशासनाने लक्ष देऊन काळाबाजारी करणाऱ्या किराणा व्यावसायिकावर कठोरपणे कारवाई करावी अशी मागणी चिमूर परिसरातील जनता करताना दिसत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!