शहर झाले आठवडी बाजार!

भाजी विक्रेते वार्डावार्डात, 
गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाचा निर्णय


मूल   (अमित राऊत)
  स्थानिक तालुक्यात कोरोना व्हायरसचा अद्याप शिरकाव झाला नसला तरी सतर्कता आणि सुरूक्षितेच्या दृष्टीने प्रशासनाने आज येथिल दर बुधवारी भरणारा आठवडी बाजार बंद करण्याचा निर्णय घेतला. आठवडी बाजारात ठिकठिकाणाहून येणा-या  भाजी विक्रेत्यांची आणि नागरिकांची  गर्दी होत होती.त्यामुळे एका ठिकाणी सर्वांनी न बसता शहरातील वार्डावार्डात भाजी विक्रेत्यांनी बसून ठरवून दिलेल्या नियमानुसार व्यवसाय करावा असे प्रशासनाने ठरविले. त्यानुसार आज भाजी विक्रेत वार्डा वार्डात आपला व्यवसाय करताना आढळून आले.काहींना हात ठेल्यांवर भाजी घेवून फिरण्याची परवानगी देण्यात आली. वार्डात ठिकठिकाणी भाजी विक्रेत्यांनी आपला व्यवसाय करून ग्राहकांची पंचाईत दूर केली. आपसूकच गर्दी टाळल्या गेल्याने नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत सुदधा केले.


चंद्रपूर जिल्हयात कोरोना व्हायरसचा  एकही रूग्ण अद्याप सापडलेला नाही. त्या धर्तीवर मूल तालुक्यात सुदधा तालुका प्रशासन ,नगर प्रशासन ,पोलिस प्रशासन आणि तालुका आपत्ती व्यवस्थापन समिती शर्थीचे प्रयत्न करीत आहेत.नगर परिषद प्रशासन आणि कर्मचारी कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर चांगलेच झटत आहे. तालुक्यात लॉकडाऊनच्या नियमाचे कशोशीने पालन केल्या जात आहे.  
दर बुधवारी भरणा-या आठवडी बाजारात भाजी विक्रेत्यांची आणि गा्रहकांची मोठी गर्दी होत होती. सोशन डिस्टंटिगंचे सुदधा पालन केल्या जात नव्हते.त्यामुळे लाकडाऊनच्या नियमाचा फज्जा उडत होता.शेवटी प्रशासनाने कडक अंमलबजावणी करण्यासाठी बुधवारचा आठवडी बाजार  बंद करून भाजी विक्रेत्यांना ग्राहकाच्या सोयी साठी वार्डावार्डात आपला व्यवसाय करण्यासाठी मूभा दिली. यामुळे बुधवारी भाजी घेण्यासाठी इतरत्र भटकावे लागले नाही.त्यांना त्यांच्या परिसरातच भाजी घेण्याची सोय उपलब्ध झाली होती. 
कोरोणाच्या व्हायरस आणि लॉकडाऊनच्या संदर्भात जिल्हा प्रशासनाने दिलेल्या निर्देशानुसार बुधवारचा आठवडी बाजार बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी भाजी विक्रेत्यांना वार्डावार्डात बसण्यासाठी मूभा देण्यात आली होती. नागरिकांच्या सुरूक्षिततेच्या दृष्टीने आणि  गर्दी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता.नागरिकांनी याला सहकार्य करावे आणि तोंडाला मास्क लावूनच महत्वाच्या कामासाठी बाहेर पडावे.  विनाकारण घराच्या बाहेर पडू नये असे नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे. श्री.विजय सरनाईक,मुख्याधिकारी,न.प.मूल*

1 टिप्पणी:

  1. भाजीपाला विकण्यास सरकारी दवाखाना रोड वर कुणीही येत नसल्याचे दिसते आहे

    उत्तर द्याहटवा

झिंदाबाद!