शासकीय अभियंत्यांचा ‘रेड झोन’ टू ‘ग्रीन झोन’ प्रवास सुरूच..। माहितीही लपवीली।


  • शासकीय अभियंत्यांचा ‘रेड झोन’ टू ‘ग्रीन झोन’ प्रवास सुरूच..। माहितीही लपवीली।
  • कारवाई करा – सावलीच्या नगरसेवकांची तहसिलदारांकडे मागणी
  • तक्रार प्राप्त होताच, होम कारन्टाईन करणार – तहसिलदार सावली


सावली (विशाल नर्मलवार)
सावली येथील गोसीखुर्द कार्यालयात कार्यरत कार्यकारी अभियंता राजेश सोनवणे व उपविभागीय अभियंता राठी हे दिनांक 18 एप्रिल 2020 रोजी ‘रेड झोन’ नागपूर येथून आले आणि ते आल्याची माहीतीही लपविली असल्यांचे उघड झाले आहे.  यामुळे शासकीय कर्मचारीच शासनाच्या आदेशाची अवेहलना करीत असल्यांची बाब स्पष्ट झाली आहे.
जिल्हयाच्या सिमा ओलांडल्यास, तातडीने विलगीकरण करण्यात येते, मात्र हे दोनही अधिकारी, आपल्या कार्यालयात काम करीत असल्यांने, अधिनस्थ कर्मचाऱ्यांस भिती निर्माण झाली आहे.
शासकीय कर्मचारी रेड झोन मधून सावलीत आल्यांने, आणि माहीती लपविल्यांने त्यांचेवर कारवाई करावी अशी मागणी सावली नगर पंचायतीचे नगरसेवक चंद्रकांत संतोषवार यांनी तहसिलदार सावली यांचेकडे लेखी निवेदनातून केल्यांने, आता या अधिकाऱ्यांवर तहसिलदार कोणतही कारवाई करतात याकडे लक्ष लागले आहे.
कोरोणाच्या पार्श्वभूमीवर देशभर लॉकडाऊन करण्यात आले आहे.  जिल्हाबंदी जाहीर केल्यांने, कुणालाही परवाणगी शिवाय जिल्हयाच्या सीमा ओलांडता येत नाही.  जिल्हयाची सिमा ओलांडल्यास आणि ही माहीती लपविल्यास गुन्हे दाखल करण्यांत येईल असे प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले आहे.  असे असले तरी, मोठया प्रमाणावर शासकीय अधिकारीच या आदेशाचे उल्लंघन करीत असल्यांचे स्पष्ट होत आहे.

“माझे पर्यंत अजुन तक्रार आली नाही, मात्र तक्रार आल्यास, त्यांना ‘होम कारन्टाईन’ करण्यांची कारवाई केली जाईल.”

श्रीमती कुमरे, तहसिलदार, सावली
उल्लेखनीय म्हणजे, यापूर्वीच सिंदेवाही येथील उपविभागीय अभियंता आणि मूल येथील शाखा अभियंत्यावरही होम कारन्टाईन करण्यात आले आहे.

“लॉकडाऊनचा उल्लंघन केल्यांने, या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी व त्यांचे संस्थात्पक कॉरन्टाईन करावे.”चंद्रकांत संतोषवार, नगरसेवक, सावली



दरम्यान तहसील कार्यालयात दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने नगरपंचायत सावली कडून या अभियंत्याचा शोध घेणे  सुरू केल्याची माहिती आहे. नगरपंचातीने याबाबत तक्रारकर्ते चंद्रकांत संतोषवार यांचेकडून या अभियंत्याची माहिती घेतल्याचे खात्रीलायक वृत्त्त आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!