भिसीत सागवान वृक्षांची कत्तल चौकसी सुरूच,पण ठेकेदारांचा शोध काही लागेना



चिमुर - तालूका प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )

चिमूर : - चिमुर तालूक्यातील भिसी उपक्षेत्र मधील भिसी जामगाव रोड लगत दिनांक.१२ एप्रिल रोजी रात्री १०:०० वाजता अज्ञात इसमाने खाजगी शेतात जवळपास १२ ट्रॅक्टर साग इमारत व साग बीटांची  अवैधरित्या तोड करून साठवन करून ठेवण्यात आले.गोपनीय माहिती वनविकास महामंडळाच्या विशेष पथकाला माहिती मिळताच विशेष पथक प्रमुख रमेश बलैया वन परीमंडळ अधिकारी व अाशिष बायस्कर क्षेत्र सहाय्यक भिसी,वनरक्षक आर.पी. अागोसे यांनी घटनास्थळी जाऊन सदर अवैद्य सागवान जप्त केले.त्या नंतर टिट्वी व भिसी आश्रम शाळेच्या मागे लाखोचा अवैद्य सागवान जप्त केला. परंतु अाता पर्यंत कोणत्याही ठेकेदाराला ताब्यात वनविभागाने घेतले नाही.ठेकेदाराला वाचविण्याचे प्रयत्न तर नाही होत आहे ना  ? किंवा वनविभागाच्या कर्मचाऱ्याना वाचविण्याचे पर्यंत तर नाही ना ? लाखो रूपयाचे अवैद्य सागवान कापण्यात अाले आहेत. ३ ते ४ वर्षा पासुन ठेकेदार अवैद्य पध्दतीने सागवान वृक्ष तोड करीत आहे.या क्षेत्रातले वनरक्षक व वनपाल दुर्लक्ष का करीत अाहेत. त्यात यांचे तर अार्शिवाद नाही ना ? अशी भिसी परीसरात चर्चा सुरू झालेली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!