जांभुळघाट येथील शिख ( सिकलीगर )समुदाय यांचे कडून तांदुळ व किराणा जीवनावश्यक वस्तुचे वाटप



चिमुर - तालूका प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )

चिमूर : - कोरोना विषाणूच्या संसर्गामुडे सर्वत्र संचार बंदी आहे. परिणामी सर्व कामे ठप्प पडल्याने मजुरीच्या भरोशावर असणारे कुटुंब अडचणीत आले आहेत.
शहरातील  गरजूंना जीवनावश्यक वस्तू वितरण करण्यात आले. कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी देशभरासह राज्यातही संचार बंदी लागू करण्यात आली आहे. सर्वत्र १४४ कलम लागू करण्यात आल्याने शेतकरी व गरीब, मजुरावर, उपासमारीची पाळी आलेली आहे.आता काहीवर अशी वेळ आली की उपासमारी मुळे चोरी करून पोट भरण्याची वेळ अाली आहे.कारण जे मजुर व व्यवसायीक लोक सकाळी व्यवशायला किंवा मजुरा जायचे व सायंकाळी आपली चुल पेटवीत असते.या लोकानवर उपासमारी अाली आहे.मौजा जांभुळघाट येथील जंगम समाज, बहूरूपी समाजावर व मध्य प्रदेशातुन आलेले परप्रांतीय यांच्या वर उपासमारी आली आहे. त्यामुळे या गरजूंची होरपळ होऊ नये या दृष्टीकोनातून मौजा.जांभुळघाट ता.चिमुर जि.चंद्रपुर  येथील शिख(सिकलीगर)समुदाय यांचे कडुन तांदुळ,व किराना जिवनावश्यक वस्तुचे वाटप करण्यात आले.या कार्यात शिख समुदयांन चे प्रमुख बच्चुसिंग जुनी,सतसिंग जुनी,मोहनसिंग जुनी,लखनसिंग जुनी,पुमनसिंग जुनी,रवीसिंग जुनी व सर्व जुनी परीवार सहभागी होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!