चिमूर तालुक्यात व शहरात खुलेआम ठाणेदाराच्या आशिर्वादाने अवैध देशी विदेशी मोहफुलाची दारू विक्री सुरू - सचिन फरकाडे भाजपा शहर अध्यक्ष



चिमूर - प्रतिनिधी ( विलास मोहिनकर )

चिमूर : - चिमूर तालुक्यात व चिमूर शहरात खुलेआम ठाणेदाराच्या आशिर्वादाने अवैध देशी विदेशी व मोहफुलाची दारू विक्री सुरू मोठ्या प्रमाणात सर्रास दारू विक्री सुरू असून याबद्दल अनेक तक्रारी व नेहमी काही प्रमाणात ज्यांनी हप्ता दिला नाही त्यांची दारू पकडण्यात येते.

व काही दारू विक्रेते २४ तास मोहफुल व देशी तसेच विदेशी दारू विक्री करीत असून चौकातून पोलीस परत जात असतात एकिकडे संपुर्ण चिमूर शहरावर नियंत्रण ठेवण्यासाठी CCTV कॅमेरे पोलीस अधिक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी लावली असून दारू हि सुटकेस व पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या व कॅन मध्ये नेल्या जात असून यावर CCTV कॅमेऱ्याची दृष्टी पडत नसून याकडे वारंवार दुर्लक्ष होतांना दिसत आहे.

रात्रोच्या वेळेस पोलीस पेट्रोलिंग करीत असतांना शहराबाहेर कॅमेऱ्याच्या आड सूचना देत दारूची वाहने सोडण्याची कामे करीत असतात.

जेव्हा चिमूर शहरात खुलेआम दारू विक्री सुरु असते तेव्हा ? चालू जिल्यापासून बंद असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात व चिमूर शहरात दारू येते तरी कशी ? नाक्यावर पोलीस असतांना , पोलीस पेट्रोलिंग करीत असतांना , वाहतूक सुरक्षा रक्षक यांच्या नजरेने खरोखर या दारूच्या गाड्या ( वाहन ) दिसत नाही यावर ? नेहमी जनता उदभवत असते म्हणून या सर्व अवैध दारू विक्री वर आढा घालून अवैध व्यसयावर बंद करण्यात यावे अशी मागणी भाजपचे शहर अध्यक्ष सचिन फरकाडे यांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!