व्यक्तिकेंद्रित असने धम्माला घातक - ॲड. भूपेश पाटील
व्यक्तिकेंद्रित असने धम्माला घातक
- ॲड. भूपेश पाटील
पळसगाव - प्रतिनिधी ( विकास खोब्रागडे )
पळसगाव भवतु सब्ब मंगलम हे बुद्ध धम्माचे मुळ तत्व असल्याने बुद्ध अनुयायानी कायमस्वरूपी सार्वजनिक हितासाठीच विचार करने अपेक्षित आहे मात्र व्यक्तिकेंद्रित होण्याची भावना दिवसेंदिवस बळावत चालल्याने धम्मामुळे तथागत भगवान गौतम बुद्धाला अभिप्रेत असलेली सामाजिक प्रगती प्रत्यक्षात येवू शकलेली नाही. असे प्रतिपादन आंबेडकरी विचारवंत व बौद्ध साहित्याचे अभ्यासक ॲड. भूपेश पाटील यानीं धम्मपरिषदेत व्यक्त केले. नेरी जवळ असलेल्या शिवनपायली येथे दरवर्षी २ व ३ फेब्रुवारी ला धम्मपरिषद आयोजित केली जाते व या धम्मपरिषदेत अभ्यासक मंडळी वेगवेगळ्या विषयावर सखोल चिंतन व मार्गदर्शन करीत असल्याने संपूर्ण चिमूर तालुक्यातील बौद्ध उपासक उपासिका विचार ऐकण्यासाठी येत असतात. या वर्षी " बाबासाहेबानां अभिप्रेत सामाजिक व्यवस्था " हा विषय असल्याने परिषदेला अभ्यासकांचे विचार ऐकण्यासाठी अभूतपूर्व गर्दी झाली होती. मुख्य कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पि. एम. डांगे होते तर उदघाटन एम. एस. जांभूळे यांचे हस्ते झाले.
बाबासाहेबानां अभिप्रेत सामाजिक व्यवस्था या विषयावर मार्गदर्शन करतांना ॲड. भूपेश पाटील यानीं धम्मचक्र प्रवत्तन हे बाबासाहेबांनी केवळ स्वताची स्वतंत्र ओळख व्हावी म्हनुन नव्हे तर बहुजन समाजातील अंधश्रद्धा अघोरी प्रथा तसेच अवैज्ञानिक परंपरा पासून कायमची मुक्ती मिळावी या साठी असल्याचे प्रतिपादन केले. ते पुढे म्हनाले कि चिकित्सा हि भगवान बुद्धाने दिलेल्या धम्माचा मुळ गाभा आहे आणि हेच बुद्ध धम्माचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे. बाबासाहेबांच्या नजरेत त्रिपिटक सारखे ग्रंथ असतानां सुद्धा चिकित्सेचा आधार घेवूनच बाबासाहेबानीं बुद्ध आणि त्याचा धम्म ह्या ग्रंथाचे लेखन करून आम्हा सर्वानां शुद्ध बुद्ध सांगितला आणि हा ग्रंथच आमच्यासाठि प्रमाण आहे. धम्माच्या नावावर अनेक बाबी वेगवेगळ्या स्वरूपात भदंत व उपासकाकडुन सांगितल्या जातात मात्र भावनिक न होता ह्या बाबी तथागताला आणि बाबासाहेबानां अभिप्रेत होत्या का हे तपासून पाहुन त्याची चिकित्सा करणे गरजेचे आहे अन्यथा चुकीच्या परंपरा धम्मात यायला वेळ लागनार नाही आणि त्यामुळे धम्माचे अस्तित्व धोक्यात येइल असा इशारा त्यानीं दिला. लोक आग्रहास्तव उपस्थित झालेल्या सामाजिक प्रगतीच्या मुद्द्यावर बोलतानां ॲड. पाटील म्हणाले कि सर्वजण हिताय सर्वजण सुखाय हि बुद्धाची परंपरा आहे मात्र आज सामाजिक चित्र वेगळे दिसते बाबासाहेबांच्या अपेक्षेनुसार ज्यांची वैयक्तिक प्रगती झाली ते आपल्या कमाईतील वाटा सामाजिक कल्याणासाठी वापरतानां दिसत नाहीत मात्र व्यक्तिगत उत्थानासाठी कार्यरत असतात त्यामुळे समाजातील फक्त काही विशेष व्यक्तींची प्रगती होतानां दिसते परंतू संपूर्ण समाजाच्या प्रगतीचा आलेख मागे जात आहे त्यामुळे विशेषकरून आंबेडकरी समाजाने आता सामुदायिक प्रगती कशी होइल याचे प्रयत्न करने गरजेचे असून त्यासाठी समाजाने पुढील रणनीती ठरवणे व त्यातून राजकारण अर्थकारण शिक्षणक्षेत्र यावर समाजाची पकड मजबूत करणे हि काळाची गरज असल्याचे त्यानी विषद केले. या कार्यक्रमात प्रेमकुमार खोब्रागडे, नागनाथ फुलझेले, मिलिंद मेश्राम, माधूरी गायधनी, नर्मदा रामटेके ,भाऊराव निरांजने यांनीही आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे समापन धम्म दिक्षा कार्यक्रम व भोजन दानाने झाले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!