अवैध प्रवासी वाहतूक - खैरी जवळ अपघात 11 जखमी 4 गंभीर
शंकरपूर -
चिमूर शंकरपूर कांपा मार्गावरील खैरी जवळ टाटा सुमो mh19.. ae7301ही अवैध प्रवासी घेऊन सकाळी 10 वाजता कानपा कडे जात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाला यात 11 प्रवासी जखमी झाले असून त्यातील 4 प्रवासी गंभीर आहे...
शंकरपूर येथील टाटा सुमो वाहन क्रमांक mh19 ae 7301 हे वाहन प्रवासी घेऊन कानपा ला निघाले होते खैरी जवळ आले असता वाहन चालक राजीक शेख यांचे वाहनावरील ताबा सुटल्याने रस्त्याच्या कडेला पलटी झाली त्यात वाहन चालक राजीक शेख 22 ,कविता गोपीचंद मेश्राम 46, गोपीचंद नथु मेश्राम 50 ,सुमन शालीक डहाके 64 ,शालीक डहाके 70, प्रभाकर दाघो बारेकर 60, वरील सर्व राहणार शंकरपूर येथील आहे तर आंबोली येथील कांशीराम गोविंदा ठाकरे 40,व कांता कांशीराम ठाकरे 34 , ,चांदी येथील आडकू तिकडू मारबते 65, जवळी येथील लक्ष्मण ननावरे 65, कवडशी देश येथील दिनकर पांडुरंग देशमाने हे जखमी झाले असून त्यांना शंकरपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आणले असता त्यातील जखमींना चिमूर, चंद्रपूर व नागपूर ला पुढील उपचारासाठी रवाना करण्यात आले आहे
पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जांभळे, फौजदार लोटकर, खोब्रागडे, पोलीस नागरगोचे अधिक तपास करीत आहे.....



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!