कृषी महाविद्यालयाचे पारडी येथे रासेयो शिबिर संपन्न

वृत्त ....
कृषी महाविद्यालयाच्या रासेयो शिबिरात व्यसनमुक्तीपर व्याख्यान व चित्रप्रदर्शिनी .....

नवयुवकांनी व्यसनांच्या अविवेकी कृतीपासून दूर रहावे - बंडोपंत बोढेकर


पारडी (प्रतिनिधी ) - डाॕ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ च्या कृषी महाविद्यालय गडचिरोली चे राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे वतीने विशेष ग्रामीण शिबिर पारडी (कुपी ) येथे घेण्यात आले होते . ह्या शिबिरात व्यसनमुक्तीपर मार्गदर्शन व चित्रप्रदर्शिनी ह्या कार्यक्रमाचे मार्गदर्शक म्हणून ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर , नशाबंदी मंडळाचे संघटक संदीप कटकुरवार , प्रा. एनप्रेड्डीवार , कार्यक्रम अधिकारी प्रा. नयना पळसपगार उपस्थित होते . कार्यक्रमाचे प्रास्तविक प्रा. पळसपगार यांनी केल्यानंतर सहभागी शिबिरार्थ्यांनी आणि ग्रामस्थांनी व्यसनविरोधी पोस्टर प्रदर्शिनीचे अवलोकन केले. याप्रसंगी बंडोपंत बोढेकर म्हणाले , स्वतःच्या विकासासाठी स्वतःला धडपड करावी लागते. बाहेरून कुणी आपला उध्दार करेल या भ्रमात न राहता व्यसनमुक्त जीवनाचा अंगिकार करावा. न्युनगंड आणि आत्मविश्वासाच्या अभावामुळे वैफल्यग्रस्त होऊन स्वतःचे नुकसान करू नये. स्वतःच स्वतःचे उध्दारकर्ते बना , व्यसनाच्या अविवेकी कृत्यापासून नवयुवकांनी दूर रहावे , असे आवाहन त्यांनी केले. संदीप कटकुरवार यांनी नशाबंदी मंडळाच्या कार्याची विस्तृत माहिती दिली.
आदल्या दिवशी झालेल्या महिला सक्षमीकरण कार्यक्रमात सौ. योगिता दशमुखे , सौ. प्रमिला अलोने, सौ. अर्चना चुधरी , सौ. वर्षा मनवर आदींनी विषयानुरूप विचार मांडले. तर राष्ट्रसंताच्या विचारातून ग्रामपरीवर्तन ह्या विषयावर श्रीगुरूदेव सेवा मंडळाचे जिल्हाध्यक्ष डाॕ. शिवनाथ कुंभारे , रविंद्र भुसारी , पंडीत पुडके , डाॕ. एस.बी.अमरशेट्टीवार , सरपंच संजय निखारे आदींनी विचार व्यक्त केले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!