UCMAS च्या राज्यस्तरीय अब्याकस स्पर्धेत चिमूर येथील तीन विद्यार्थी अव्वल

UCMAS च्या राज्यस्तरीय अब्याकस स्पर्धेत चिमूर येथील तीन विद्यार्थी अव्वल


चिमूर - प्रतिनिधी ( विलास मोहिनकर )

चिमूर : - चिमूर व सभोवतालील परिसरातील ग्रामीण विद्यार्थांना नवीन पद्धतीचे शिक्षण मिळावे व मोठ्या शहरातील मुलांप्रमाणे लहान वयातच त्यांना भविष्यातील स्पर्धेसाठी तयार करावे या उद्देशाने डॉ. अजय पिसे यांच्या मार्गदर्शनात लोकेश बंडे यांनी चिमूर येथे ‘अब्याकस’ चे प्रशिक्षण केंद्र स्थापन केले असून त्यामध्ये परिसरातील तीस विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत. नागपूर येथे नुकत्याच पार पडलेल्या UCMAS च्या राज्यस्तरीय स्पर्धेत महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. यामध्ये चिमूर येथील मंदार सुरेश लाखे, साहिल नामदेव गाडगे, व रोनित राहुल गाडगे हे अव्वल ठरले आहेत.
 
UCMAS चे मुख्य कार्यकारी संचालक दिलीप जैन यांच्या हस्ते या विद्यार्थांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला उपस्थित अजय पालीवाल, नितीन चावरे, सोनाली उबारे, पियुष जैन, महिंद्र सर यांनी विद्यार्थांचे तसेच अब्याकस च्या चिमूर शाखेचे संचालक  लोकेश बंडे यांचे अभिनंदन केले.विद्यार्थांनी आपल्या या यशाचे श्रेय आपल्या पालकांना, व शिक्षकांना आणी संचालक लोकेश बंडे यांना दिले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!