मॅजिक बस इंडिया फाउंडेशन संस्थेच्या वतीने मुख्याध्यापकांची कार्यशाळा व कार्यक्षेत्र भेट संप्पन

मॅजिक बस इंडिया फाउंडेशन संस्थेच्या वतीने मुख्याध्यापकांची कार्यशाळा व कार्यक्षेत्र भेट संप्पन

चंद्रपूर - दिनांक - 28 नोव्हेंबर 2019 ला मॅजिक बस इंडिया फाउंडेशन संस्थेचे वरिष्ठ जिल्हा कार्यक्रम अधिकारी मा. प्रशांत लोखंडे यांच्या मार्गदर्शनात व नियंत्रणात SCALE कार्यक्रमा अंतर्गत पंचायत समिती चंद्रपूर येथील मुख्याध्यापकांची एक दिवसिय कार्यशाळा आयोजित करण्यात आली.  त्या मागील मुख्य हेतू असा की मॅजिक बस संस्थेच्या द्वारे १२ ते १६ वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी  "खेळा द्वारे शिक्षण/जीवनकौशल्य विकास" हा कार्यक्रम चंद्रपूर जिल्ह्यातील काही तालुक्यात राबविला जात आहे. आणि तो नव्याने चंद्रपूर पंचायत समिती मध्ये येणाऱ्या काही शाळांन मध्ये राबविला जाणार आहे. त्याची संपूर्ण माहिती चंद्रपूर तालुक्यातील खाजगी व जिल्हा परिषद शाळेच्या  मुख्याध्यापकांना असावी या हेतूने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. ज्या मध्ये प्रथमतः न्यू इंग्लिश हायस्कूल चंद्रपूर येथे मॅजिक बस संस्थेच्या कार्यक्रमाची ओळख करून देण्यात आली आणि त्या नंतर मुल तालुक्यातील जि. प. उच्च. प्राथ. शाळा खालवसपेठ या कार्यक्षेत्राला भेट देण्यात आली. व सर्व मान्यवरांच्या द्वारे मॅजिक बस संस्थेच्या कार्याची पाहणी करण्यात आली.  मा. मनोज गलबले सर यांनी मॅजिक बस सत्राचे प्रात्यक्षिक सादर केले. ज्या मध्ये चंद्रपूर तालुक्यातील ५० शाळेतील मुख्याध्यापकांचा सहभाग होता.
          सदर कार्यशाळा मा. गद्देकार सर मुख्याध्यापक जि. प. उच्च प्राथ. शाळा खालवसपेठ व शाळेतील सर शिक्षकवृंद तसेच मा. वरिष्ठ जिल्हा कार्यक्रम अधिकारी मॅजिक बस चंद्रपूर, मा. जिल्हा प्रशिक्षण अधिकारी मॅजिक बस चंद्रपूर, मा. तालुका समन्वयक  मॅजिक बस चंद्रपूर व मुल, संपूर्ण शाळा सहायक अधिकारी मॅजिक बस चंद्रपूर यांच्या अथक परिश्रमाने यशस्वीरीत्या पार पडली.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!