ॲड. भूपेश वामनराव पाटील यानां डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार प्रसार पुरस्काऱ जाहीर

ॲड. भूपेश वामनराव पाटील  यानां  डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार प्रसार पुरस्काऱ जाहीर


पळसगाव - प्रतिनिधी ( विकास खोब्रागडे )

पळसगाव : - राष्ट्रसंत विचार साहित्य परिषदेच्या केंद्रीय समिती तर्फे दिला जानारा अत्यंत सन्मानाचा नारायण गेडकर स्मृती डा. बाबासाहेब आंबेडकर विचार प्रसार पुरस्कार यंदा चिमूर तालुक्यातील वडसी गावाचे सुपुत्र आंबेडकरी सहित्याचे अभ्यासक साहित्यिक कवी सामाजिक कार्यकर्ते ॲड. भूपेश वामनराव पाटील यानां जाहिर झाला आहे. 

राष्ट्रसंत विचार साहित्य परिषदेच्या केंद्रित समिती तर्फे डा. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रचार व प्रसार करनाऱ्या व्यक्तिला हा पुरस्कार बहाल केला जातो. सामाजिक क्षेत्रात हा पुरस्कार अत्यंत सन्मानाचा समजला जातो. ॲड. भुपेश पाटील हे चिमूर तालुक्यातील वडसी या खेडेगावातील असून १२ व्या वर्गात गुणवत्ता यादीत पाचव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्यानंतरहि त्यानी शासकीय सेवेसारखे पारंपारिक मार्ग न चोखाळता नागपूर विद्यापीठातुन विधी अभ्यासक्रमाचे शिक्षण घेतले व सध्या ते मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अधिवक्ता म्हणून कार्यरत असतानाच त्यानीं आपल्या जन्मक्षेत्राला आपली कर्मभूमी मानून २००१ पासून विविध सामाजिक कार्य करीत आहेत. त्यानीं ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रसंत तूकडोजी महाराज ग्रामीण विकास संस्थाची स्थापना करून शालेय विद्यार्थ्यांना गणवेष व शैक्षणिक साहित्य वाटप, ग्रामीण विद्यार्थ्यांना संगनक ओळख होण्यासाठी शाळेला संगणक देने मोफत कायदेशीर सल्ला शिबिराचे आयोजन करने अशी अनेक समाजोपयोगी कार्य करीत आहेत. त्यानीं स्वतःचे वडिलांचे स्मृतीमधे वामनराव पाटील स्मृती प्रतिष्ठान या संस्थाची स्थापना केली असून या संस्थातर्फे विविध परिक्षेत  यश प्राप्त करनाऱ्या विद्यार्थ्यांना व शिक्षकानां सन्मानित करने बौद्ध विहारानां सांस्कृतिक व शैक्षणिक कार्यक्रमाचे आयोजनाकरिता साउंड सर्व्हिस भेट देने बुद्ध जयंतीच्या कार्यक्रमाचे आयोजन करने बौद्ध विहारानां भारतीय संविधान व बुद्ध आणि त्याचा धम्म ग्रंथाचे वितरण करने अशी कार्ये करीत आहेत. यासोबतच ग्रामीण साहित्यिकानां साहित्य प्रकाशित करन्यासाठि ते गेले १९ वर्षे तपोभूमी हे त्रैमासिक  सातत्याने प्रकाशित करीत असून लेखकांचे साहित्य प्रसिद्ध व्हावे तसेच झाडीबोली साहित्याचे संवर्धन व्हावे म्हणून त्यानीं बोलीभाषा साहित्य संवर्धन महामंडळाची स्थापना केली असून या संस्थातर्फे अनेक ग्रामीण लेखकांच्या पुस्तकाचे  प्रकाशक केलेले आहे.  चिमूर सारख्या ग्रामीण भागात त्यानी राष्ट्रीय स्तरावरील पहिले आंबेडकरी साहित्य सम्मेलन यशस्वी करून दाखवले ते या साहित्य सम्मेलनाचे स्वागताध्यक्ष होते. नुकताच त्यांच्या गाव पेटून उठतो तेव्हां या काव्यसंग्रहाला थायलंड येथे आंतरराष्ट्रीय पुरस्कार देवून गौरवण्यात आले आहे. सदरचा पुरस्कार त्यानां दिनांक २२ डिसेंबर २०१९ रोजी पेंढरी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य विचारकृती सम्मेलनात प्रदान केला जानार असल्याची अधिकारीक घोषणा बंडोपंत बोढेकर यानीं केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!