पंचायत राज प्रशिक्षण केंद्र मुल येथे स्वयंरोजगार प्रशिक्षण संपन्न

पंचायत राज प्रशिक्षण केंद्र मुल येथे स्वयंरोजगार  प्रशिक्षण संपन्न


पळसगाव - प्रतिनिधी ( विकास खोब्रागडे )

पळसगाव : - पंचायत राज प्रशिक्षण केंद्र मुल तर्फे बचत गटातील महिलांना दिनांक १६ ते २८ डिसेंबर २०१९ तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम
१२ दिवस घेण्यात आला.या प्रशिक्षणात गरपल्लीवार साहेब प्राचार्य पंचायत राज प्रशिक्षण केंद्र मुल, वराटकर सर, विद्या गेडाम,नैताम सर, धारणे सर या मान्यवरांनी मार्गदर्शन केलेतर पुरुषोत्तम वाळके चिमूर व चैताली वाघ यांनी उपस्थित प्रशिक्षणार्थीना १)वॉशिंग पावडर २)फीनाईल ३)परफ्युम सेंट ४)हँड वॉश लिक्विड ५)डिशवॉश लिक्विड ६)टायलेट क्लीनर ७)ग्लास क्लीनर या व्यवसायाचे प्रात्यक्षिकसह  प्रशिक्षण देण्यात आले.जे साहित्य बनविले ते टेस्ट केल्या
नंतर उत्तम दर्जाचे निर्माण झाले. पंचायत राज प्रशिक्षण केंद्र मुल येथे उद्योग प्रशिक्षण  पुरुषोत्तम वाळके किसान मित्र संस्था नेरी व चैताली वाघ यांनी उपस्थित २५० महिला प्रशिक्षणार्थीना ७ व्यवसायाचे प्रात्यक्षिकसह  प्रशिक्षण देण्यात आले.या प्रशिक्षणाला *निलेश देवतळे, पुरुषोत्तम वाळके चिमूर,चैताली वाघ (वर्धा), नंदाताई वाळके,नितेश ढोक, किशोर पोहीणकर यांनी गाने  प्रात्यक्षिक, गटचर्चा, कृती पर खेळ या माध्यमातून प्रशिक्षण दिले.या प्रशिक्षणा ला MSRLMअंतर्गत कार्यरत   सी.आर.पी,बुक कीपर,व बचत गटातील मुल,  सिंदेवाही,सावली,पोम्भूर्णा ४ तालुक्यातील प्रतिनिधी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!