स्वराज्य बांधकाम कामगार संघटनेने मुखमंत्री उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगारांच्या विविध समस्या त्वरित निकाली काढण्यासाठी तहसिलदारा च्या वतीने दिले निवेदन
स्वराज्य बांधकाम कामगार संघटनेने मुखमंत्री उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगारांच्या विविध समस्या त्वरित निकाली काढण्यासाठी तहसिलदारा च्या वतीने दिले निवेदन
चिमूर - प्रतिनिधी ( विलास मोहिनकर )
चिमूर : - महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाद्वारे कामगांराना व त्यांच्या कुटुंबाना बहुविध योजनांचा लाभ देण्यात येते. मात्र शासण प्रशासणाच्या उदासीनतेमुळे कामगाराची नोंदणी व लाभ मिळण्यास अडचणी येत आहेत .
कामगारांच्या अनेक समस्यांच्या निराकरणा करीता स्वराज्य बांधकाम कामगार संघटनाच्या वतीने आज चिमूर च्या तहसील कार्यालया समोर धरणे आंदोलन स्वराज्य बांधकाम कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष धनराज गेडाम यांच्या नेतृत्वात करन्यात आले.
कामगारांच्या अनेक समस्यांच्या निराकरणा करीता स्वराज्य बांधकाम कामगार संघटनाच्या वतीने आज चिमूर च्या तहसील कार्यालया समोर धरणे आंदोलन स्वराज्य बांधकाम कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष धनराज गेडाम यांच्या नेतृत्वात करन्यात आले.
नोंदणीकृत कामगार व इमारत कामगारांच्या समस्या व मागण्या चिमूर जिल्ह्याची निर्मिती करावी व सहायक कामगार आयुक्त कार्यालय सुरु करावे, १०० कामगाराची यादी योग्य कागदपत्रांसह सादर केल्यास प्राधिकृत नोंदणी अधिकारी यांनी कामगारांचे सोईचे ठिकाणी नोंदणी शिबिर आयोजित करून नोंदणी करावी,राज्यात प्राधिकृत करण्यात आलेल्या नोंदणी अधिकारी बि.डी.ओ. व उपविभागीय अभियंता तसेच सिंचाई बांधकाम पाटबंधारे विभाग यांना योग्य प्रशिक्षण देऊन १०० टक्के कामगारांची नोंदणी करण्यास आदेश करावे, प्राधिकृत अधिकारी यांनी नोंदणी कार्यालयात हयगय केली व शासन निर्णयाला केराची टोपली दाखविली अशा सर्व प्राधिकृत अधिकारी यांच्यावर योग्य कार्यवाही करन्यात यावी,नोंदणी व लाभाचे कामाकरिता प्रत्येक जिल्ह्यात दलाल सक्रिय असून कामगारांची आर्थिक पिळवणूक करतात, त्यांचा खास यंत्रेनेमार्फत शोध घेऊन फोजदारी गुन्हे दाखल करावे,अशा विविध एकविस प्रकारच्या समस्यांचे निवेदन घेऊन महाराष्ट्रचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, यांना चिमूर तहसीलदाराच्या मार्फत देण्यात आले, यावेळी स्वराज्य बांधकाम कामगार संघटनेचे राज्याध्यक्ष धनराज गेडाम ,राज्य कोषाध्यक्ष शारदा गेडाम , राज्यकार्यालयीन सचिव नरेश पिल्लेवान, राज्यसचिव देवचंद टेंभूरकर , प्रंशांत घुग्घुसकर , गुरूदास सोनटक्के , राकेश लांजेवार , सुरज पाल , गजानन शेडामे , रविंद्र गोंगले , बंडू सोनवाने , श्याम नंदागवळी, तुळशिदास बन्सोड , अलिम शेख,स्वराज्य बांधकाम कामगार संघटना चिमूर तालुका व चिमूर शहर कार्यकारणी व कामगारांच्या न्याय हक्का करीता धरणे आंदोलनाला तालुक्यातील बांधकाम कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.





चिमूर ते तळोधी ना. जाणारा मार्गाचे काम बंद असल्यामुळे चिमूर ला शिक्षणाकरिता जाणाऱ्या विद्यार्त्यांना तसेच इतर कामगारांना त्रास सहन करावा लागत आहे. तरी त्या मार्गाचे काम लवकरात लवकर सुरु करावे। व जाण्या -येण्या करीता पर्यायी मार्ग करुन घ्यावे ।
उत्तर द्याहटवा