रक्तदान शिबिर.

 
सोमेश्वर रेड्डीवार(मूल ग्रामीण)

मूल येथे जगतगुरु नरेंद्रचार्याजी महाराज संप्रदाय मुल च्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन  आज दिनांक 02 / 10 / 2019 रोज बुधवारला  जगतगुरु महाराजांच्या जन्मदिनानिमित्याने  दरवर्षी प्रमाणे याही वर्षी उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय मूल येथे  रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

 संप्रदायाचे मुल शहर अध्यक्ष सुमीत समर्थ आणि त्यांची संपूर्ण टीम यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम दरवर्षी घेण्यात येते, या वर्षी रक्तदान शिबिराचे उदघाटन महावितरण चे अधिकारी श्री चौरसिया यांचे हस्ते झाले.

अध्यक्षस्थानी महावितरण अधिकारी श्री लांजे, तर प्रमुख उपस्थिती सर्वश्री किशोर कापगते, डॉ इंदूरकर, संदीप मोहबे, प्रशांत गट्टवार, विवेक मुत्यालवार, सचिन बोर्डावार शैलेश देशेट्टीवार अरविंद करपे एन टीव्ही चे पत्रकार सतीश आकुलवार इतर मान्यवर उपस्थित होते जास्तीत जास्त युवा पिढीने रक्तदान करावे रक्तदान हे सर्व श्रेष्ठ दान असे सुमित समर्थ यांनी आपल्या मार्गदर्शनातून सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!