माता जागृत झाली तर कुटुंबाचा उद्धार नक्की होऊ शकतो - विनोद ठाकरे जिल्हा समन्वयक
माता जागृत झाली तर कुटुंबाचा उद्धार नक्की होऊ शकतो
- विनोद ठाकरे जिल्हा समन्वयक
पळसगाव - प्रतिनिधी ( विकास खोब्रागडे )
पळसगाव : - दिनांक ३०/०९/२०१९ सोमवारला सिंदेवाही तालुक्यातील मिनघरी येथे माता सभा घेण्यात आली. या सभेला शाळेतील सर्व शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, माता पालक आणि पालक वर्ग यांनी सक्रीय सहभाग दर्शविला. सर्वप्रथम सभेमध्ये मातांना साहित्याचे वितरण करण्यात आले. त्यामध्ये चौथा आठवडा, आणि गमतीदार गोष्टी हे साहित्य होते. त्यानंतर मातांना साहित्य कसे वापरायचे आहे, हे समजावून सांगण्यात आले. त्याचबरोबर आपण रोज घरी मुलांना अभ्यासात मदत केल्यास मुलांना अभ्यासाची सवय लागेल. त्यांना आपल्याला घरी रोज अभ्यासावर विचारतात म्हणून अभ्यास करायला पाहिजे ही भावना विकसित होईल. त्यानंतर उपस्थित सर्व शिक्षकांनी आपले मत व्यक्त केले.
त्यामध्ये मुल शाळेत फक्त 6 तास असते. उर्वरित वेळ ते घरी आणि परिसरात असते. त्यामुळे त्याचा जास्त वेळ घरी आणि परिसरात जातो. त्यामुळे फक्त शिक्षकावर अवलंबून न राहता आपणही मुलांना शिकवू शकतो असा विश्वास दाखविण्यात आला. तसेच मराठी शाळा या खाजगी शाळेपेक्षा केव्हाही पुढे आहेत हे उदाहरणासह सांगण्यात आले. मुले ही राष्ट्राची संपत्ती आहे. त्यांना सुजाण बनविन्याची जबाबदारी आम्हा सर्वांची आहे. वर्ग 1&2 हा शिक्षणाचा पाया आहे. त्यामुळे पाया मजबूत झाल्यास मुल पुढील शिक्षण घेऊ शकतो. आम्हाला पगार हा आपल्या पैशातून मिळतो म्हणून मुले शिकली पाहिजेत असे आम्हाला मनापासून वाटते. तेव्हा आपण सर्व मुलांना शिकवू या. त्यांचा शैक्षणिक स्तर वाढविण्यास एकत्र काम करूया.माता जागृत झाली तर कुटूंबाचा उद्धार होऊ शकतो. मातेने मुलाला नेहमी प्रोत्साहित करावे. घरकाम करता करता त्यांना अभ्यासात मदत करावी. रोज त्यांची विचारपूस करावी. माता मत : मी मुलांचा अभ्यास घेते. तुम्हीही घ्या. शेतात काम करतांना मालिका, चित्रपट यावर चर्चा न करता आपल्या मुलाच्या शिक्षणावर आणि अभ्यासावर चर्चा करावी. त्यांना चांगल्या सवयी आणि संस्कार करावे.या सभेत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मिनघरी येथील नंदनवार सर, सोनवाणे सर, प्रवीण नंदनवार सर, काशेटटीवार मॅडम, कामडी मॅडम, विनोद ठाकरे (जिल्हा समन्वयक चंद्रपूर). सी. आर. एल. घनश्याम खोब्रागडे आणि ज्ञानेश्वर श्रीरामे यांनी मार्गदर्शन केले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!