ग्रामस्वच्छता अभियान.

मुल (प्रकाश चलाख)

मूल तालुक्यातील हळदी येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त ग्राम स्वच्छता अभियान राबविण्यात आले. 

या कार्यक्रमांतर्गत ग्रामपंचायत कार्यालय हळदी पंचायत समिती मुल येथे महिला बचत गट व शालेय विद्यार्थ्यांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली. याप्रसंगीकार्यक्रम आयोजित करण्यात आले .यात पंचायत समिती मुल चे विस्तार अधिकारी श्री पुप्पलवर श्री प्रधान स्वच्छ भारत मिशन मुल अंतर्गत श्री गजबिये श्री येर्मलवार  सरपंच उपसरपंच व सर्व सदस्य जिल्हा परिषद शाळा सर्व शिक्षक व विध्यार्थी गावातील सर्व महिला बचत गटांच्या महिला अंगणवाडी सेविका ग्रामसेवक संगणक परिचालक गावातील युवक व पुरुष हजार होते. 

कार्यक्रमाप्रसंगी मान्यवरांनी स्वच्छते बद्दल आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमात शालेय विद्यार्थी व महिलांची लक्षणीय संख्या होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!