प्रथम शिक्षण उपक्रमा अंतर्गत विहीरगांव येते माता पालक सभा संपन्न

प्रथम शिक्षण उपक्रमा अंतर्गत विहीरगांव येते माता पालक सभा संपन्न


पळसगाव - प्रतिनिधी ( विकास खोब्रागडे )


पळसगाव : - चिमूर तालुक्यातील ताडोबा बफर झोन अंतर्गत आदीवासी भागांत वसलेल्या विहिरगाव येथे प्रथम संस्थेतर्फे दिनांक.१४/०९/२०१९ रोज शनिवारला जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा,विहिरगाव येथे माता सभा आयोजित करण्यात आली.त्या सभेत प्रथम संस्थेमार्फत चालविल्या जाणाऱ्या उपक्रमाची माहिती देण्यात आली.या उपक्रमात संस्था वर्ग १ ते ५ च्या मुलांसाठी कोणते कार्य करते हे सांगण्यात आले.तसेच वर्ग ६ ते ८ च्या मुलांसाठी लायब्ररी इंटरवेशन च्या माध्यमातून गट अध्ययन करण्याची सवय लावून त्यांना स्वयंअध्ययनाकडे वळविल्या जाते. घरकामातून मुलांना कसे शिकविता येते हे उदाहरणांसह पटवून देण्यात आले.आपण आपल्या पाल्याचा शैक्षणिक स्तर वाढविण्यासाठी मुलांच्या अभ्यासाकडे  निदान एक तास जरी रोज दिला तरी मुलांची बरीच प्रगती होऊ शकते हे समजावून सांगण्यात आले.असल्या प्रकारे आपल्या मुलांना पालकांनी घरी काही प्रमाणत अभ्यास करण्यास लावले तर निश्चितच ग्रामीण भागातील मुले प्रगती करू शकतात या सभेला गावातील सरपंच मा.केशव घरत,जीवतोडे सर (सहायक शिक्षक) तसेच माता उपस्थित होत्या.या सभेत जिल्हा समनव्यक मा.विनोद ठाकरे आणि सी.आर.एल.योगेश खोब्रागडे व घनश्याम खोब्रागडे यांनी मार्गदर्शन केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!