सुधीर भाऊंच्या वाढदिवसा निमित्त नोटबुक वितरण.

सुधीर भाऊंच्या वाढदिवसा निमित्त नोटबुक वितरण.

मुल (प्रकाश चलाख)

माननीय सुधीरभाऊ मुनगंटीवार अर्थमंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री चंद्रपूर जिल्हा यांच्या वाढदिवसानिमित्त बल्लारपूर मुल निर्वाचन क्षेत्रातील मू ल तालुक्यातील हळदी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत शालेय नोटबुकचे वितरण मूल पंचायत समितीच्या सभापती पूजा डोहने भाजपा नेते चंदू मारगोन वार यांच्या हस्ते वितरित करण्यात आले.

क्षेत्राचे लोकप्रिय आमदार त था विकासाचा महामेरू आदरणीय सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचा वाढदिवस जिल्हाभरात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येत असून त्यानिमित्ताने मूल तालुक्यातील पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हळदी येथे विद्यार्थ्यांना नोटबुकचे वितरण मुल पंचायत समितीच्या सभापती पूजा डो ह ने, भाजपा नेते चंदू मा रगो न वा र यांच्या हस्ते करण्यात आले. झालेल्या कार्यक्रमात शाळा समितीचे अध्यक्ष भास्कर गाव तुरे,भाजपा नेते जीवन चला ख ,शाळेचे मुख्याध्यापक शेरकी सर व शालेय वृंद गावातील प्रतिष्ठित नागरिक शालेय विद्यार्थी उपस्थित होते.

शालेय नोटबुक वितरण कार्यक्रमाप्रसंगी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करून क्षेत्राचे लोकप्रिय आमदार आदरणीय सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या विकासात्मक, पुण्य कार्याबद्दल मनोगत व्यक्त केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!