इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन चे पदे भरा.चंद्रकांत टिकले

चंद्रपूर (प्रतिनिधी)सीटीपिएस येथे इलेक्ट्रॉनिक्स टेलीकम्युनिकेशनच्या जागा भरण्यात याव्या अशी मागणी चंद्रकांत टिकले यांनी शासनाकडे कडे केली आहे.

चंद्रपूर येथील औष्णिक विद्युत केंद्र येथे इलेक्ट्रॉनिक्स टेलीकम्युनिकेशन  विद्यार्थ्यांचे पद भरती कनिष्ठ व वरिष्ठ अभियंता या पदासाठी करण्यात यावे अशी मागणी चंद्रपूर येथील सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत टिकले यांनी केली आहे.

 इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअर तसेच इलेक्ट्रिकल इंजिनियर अभ्यासक्रम  60%सारखा असतो आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजीनियरिंग शाखेचे विद्यार्थी पण विद्युत निर्मिती केंद्रावर विशिष्ट पदावर काम करण्यास सक्षम आहेत. सी टी पी एस मध्ये अगदी अत्यल्प पदावर  ही भरती घेतली जाते. 

हा इलेक्ट्रॉनिक्स विद्यार्थ्यांवर  एक प्रकारचा अप्रत्यक्षपणे अन्याय आहे. हा अन्याय दुर करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीयर शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी सीएसटी पी एस मध्ये पदनिर्मिती करून ही पदे तात्काळ भरण्यात यावी, यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीयर शाखेच्या विद्यार्थ्यांचा समावेश यात राहील असे निवेदन  माननीय ऊर्जामंत्री नामदार  बावनकुळे  यांना सादर करण्यात आले असून याची तात्काळ दखल घेण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत टिकले यांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!