जय माँ दुर्गा भवानी मंदिर राजीव गांधी नगर , वडाळा पैकू चिमूर येथे भव्य तान्हा पोळा संपन्न
जय माँ दुर्गा भवानी मंदिर राजीव गांधी नगर , वडाळा पैकू चिमूर येथे भव्य तान्हा पोळा संपन्न
चिमूर - प्रतिनिधी ( विलास मोहिनकर )
चिमूर : - दिनांक.०१/०९/२०१९ ला जय माँ दुर्गा भवानी मंदिर राजीव गांधी नगर , वडाळा पैकू चिमूर येथे भव्य तान्हा पोळा संपन्न झाला दर वर्षी हा तान्हा पोळा साजरा करण्यात येत असतो. व या तान्हा पोळ्याला यावेळी बाल - गोपाल यांना भाजप तर्फे नोट बुक वाटप करण्यात आले तर काँग्रेस तर्फे चहा चे ट्रे वाटप करण्यात आले.तर या कार्यक्रमामध्ये ४ बक्षिस सुद्धा ठेवण्यात आली होती ती म्हणजे नंदी बैलाची सजावट , नंदी बैल आणणाऱ्या बाल गोपालाची वेष भूषा , नंदी बैलाची सजावट व संदेश , नंदी बैलाची सजावट नसलेला , अशी हि ४ बक्षिसे ठेवण्यात आली होती तर काहिंना ईश्वर चिट्टी च्या माध्यमातून सायकल वाटप करण्यात आले तर काहिंना काँग्रेस पक्षा तर्फे ईश्वर चिट्टी च्या माध्यमातून सिलिंग फॅन सुद्धा वाटप करण्यात आले. व इतरांनी सुद्धा छोटे - छोटे बक्षिस यावेळी ईश्वर चिट्टीच्या माध्यमातून चमुंना वाटप केले.यावेळी शेकडो नागरिक व पालक वर्ग उपस्थित होते तसेच यावेळी जिल्हा परिषदेचे विरोधी गटनेते डॉ.सतीश वरजूकर , विविध कार्यकारी सोसायटीचे प्रदीप बंडे , नगर सेविका हिवरकर ताई , राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष योगेश ठुने , दिपक तिवाडे , बंडू हिवरकर , विलास कोहचाडे , गुणवंत मांडवकर , संजय भरडे , शेखर येकोणकर , राकेश मांढरे , पिंटू भरडे , रामभाऊ करारे , मेघशाम जिकार , सूरज पचारे , मंगेश घ्यार , रामभाऊ दुधनकर , राजू कारेकार , जबिर कुरेशी , रामदास ठुसे , विलास मोहिनकर , आदींची उपस्थिती होती.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!