वरोऱ्याच्या तान्हा पोळयात 'छोटा शेतकरी' ठरला आकर्षण

वरोऱ्याच्या तान्हा पोळयात 'छोटा शेतकरी'  ठरला आकर्षण  

भीक नको हक्काचे द्या म्हणत स्वामिनाथन आयोगाची केली मागणी.


वरोरा (प्रतिनिधी)
बैलांप्रति कृतज्ञता व्यक्त करणारा सण म्हणजे पोळा .शेतीमध्ये शेतकऱ्यासोबत त्याच्या बऱ्या वाईट परिस्थितीत त्याला साथ देणारा ,त्याचे सोबत राबराब राबणारा सर्जा राजा शेतकऱ्याचा खरा मित्र बैल.आपली संस्कृती बालकांना कळावी . ही तान्हा पोळा साजरा करण्या मागचे कारण. गावा गावांमध्ये नंदीबैल सजावट स्पर्धा घेण्यात येते .वरोरा शहरात सुद्धा अशा स्पर्धा ठीक ठिकाणी आयोजित केल्या होत्या .या दिवशी शेतकऱ्याचा पोशाख घालून विविध प्रकारचे देखावे बालगोपाल तयार करून आणत असतात. मात्र यात सवा॔चा आकर्षण ठरला तो "छोटा शेतकरी " म्हणजे योजश घुमे .
या चिमुकल्याने शेतकरी वेशभूषा तर धारण केली होती मात्र विशेष म्हणजे त्याच्या डोक्यावर असणारी टोपी आणि त्यावर लिहून असलेले घोषवाक्य प्रत्येकाला   आकर्षित करत होते .भीक नको  हक्काचं द्या ! स्वामिनाथन आयोग लागू करा असे त्याच्या  टोपीवर लिहिले होते .तर त्याने आणलेल्या नंदी बैलाबागे एक फलक ही सर्वांना त्यावरील मजकूर वाचायला थांबवतच होते .त्याने आणलेल्या फलकावर शेतकरी सणाच्या दिवशी  शेतकऱ्यांची मागणी  शीर्षकाखाली , काही मजकूर लिहिला होता त्या फलकावर हात वर करून त्याचा फोटो ही होता .आणि त्यावर स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लिहून .भीक नको  हक्काचं द्या म्हणत त्याने केलेली मागणी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती.लोकमान्य शिशु मंदिरात त्याच्या या देखाव्याला आणि वेशभूषेला पारितोषिक मिळाले तर रेल्वे स्टेशन व्यापारी मंडळा कडून आयोजित नंदी बैल सजावट स्पर्धेत त्याला सायकल भेट मिळाली .येथे सत्कार कार्यक्रमात त्याने उपस्थित वरोरा शहराचे प्रथम नागरिक नगराध्यक्ष अहेतेशाम अली , सभापती न प छोटुभाऊ शेख , सामाजिक कार्यकर्त्या अपूर्वा बुजोने , सिनेअभिनेत्री प्रिया मोंढे, राज्य मराठी पत्रकार संघाचे पूर्व विदर्भ अध्यक्ष महेश पानसे , पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष सुनील बोकडे, नगरसेवक सन्नी गुप्ता , रोटरी क्लब चे अध्यक्ष अमित नहार , वरोरा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रवीण खिरटकर,नगरसेविका मनीषा मेश्राम , रेल्वे स्टेशन व्यापारी मंडळाचे अध्यक्ष लखन केशवानी यांना ते फलक देत शेतकऱ्याची मागणी शासनापर्यंत पोहचविण्याची विंनती केली .त्याच्या या वेशभूषा आणि या उपक्रमाची संकल्पना  त्याचे वडील सामाजिक कार्यकर्ते आशिष घुमे यांची असून  .शेतकरी सणाच्या दिवशी शेतकऱ्यांची व्यथा आणि मागणी सरकार पर्यंत  पोहचविणे हाच एकमेव उद्देश असल्याचं त्यांनी सांगितले . अनेक मान्यवरांनी त्या छोट्या शेतकऱ्याचे कौतुक केले .

*चिमुकल्याची मागणी पोहचविणार शासनदरबारी -... छोटुभाऊ शेख*

स्वामिनाथन आयोग लागू करण्याबाबतचे योजश घुमे या छोट्या शेतकऱ्याने दिलेले निवेदन विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडडेट्टीवार यांच्याकडे पाठवीत असल्याची माहिती न.प.सभापती छोटू भाऊ शेख यांनी यावेळी मंचावरून दिली. त्या वरून या चिमुकल्याच्या मागणीचा विचार करून विरोधीपक्ष नेते विजय वडडेट्टीवार यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची मागणी शासन दरबारी पोहचेल अशी आशा आहे .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!