महिला स्वावलंबी होणे काळाची गरज.आम. राजे अम्ब्रिशराव आत्राम.
महिला स्वावलंबी होणे काळाची गरज
आ.राजे अम्ब्रिशराव आत्राम
अहेरी (सेवा पवार)
अहेरी येते महिला बचत गट प्रशिक्षण शिबिराला महिलांचा प्रचंड प्रतिसाद अहेरी विधानसभा क्षेत्रातील महिला बचत गटासाठी महाराष्ट्र राज्य महिला आयोग व महाराष्ट्र शासनाच्या वतीने प्रज्वला योजने अंतर्गत अहेरी जवळील महागाव येतील हकीम मंगल कार्यालय येथे काल दि. 28 आगस्ट रोजी बचत गटांच्या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार मा.श्री. राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या हस्ते करण्यात
आले,ह्यावेळी अहेरीचे नगराध्यक्षा हर्षाताई ठाकरे,अहेरीचे संवर्ग विकास अधिकारी महेश ढोके सह इतर अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
ह्यावेळी बोलतांना राजे साहेब मनाले महिला ह्या कुटुंबाचा आधार असतात,महिला सक्षम झाल्या तर आपोआपच संपूर्ण कुटुंब सक्षम होतो त्यामुळेच महिला ह्या स्वावलंबी होणे ही ह्या काळाची गरज आहे हे लक्षात घेवूनच सरकारतर्फे प्रज्वला योजने अंतर्गत महिला बचत गटांसाठी असे प्रशिक्षण शिबीर आयोजित केले जात आहे, सर्व महिलांनी ह्या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन ह्यावेळी त्यांनी केले.
ह्या शिबिरात अहेरी विधानसभा क्षेत्रातील विविध महिला बचत गटांच्या जवडपास ४ हजार महिलांची उपस्थिती होती.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!