विविध विकास कामांचे आमदार राजे अम्ब्रिशराव आत्रम यांच्या हस्ते भूमिपूजन.

अहेरी (सेवा पवार) 

अहेरी शहरातील विकासकामांचे भूमिपूजन आ.राजे अम्ब्रीशराव आत्राम यांचा हश्ते संपन्न झाले.

अहेरी शहरातील जवडपास ७ कोटी निधींच्या विकासकामांचे भूमिपूजन काल अहेरीचे आमदार राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या हस्ते संपन्न झाले. या विकास कामांमध्ये अहेरी खमनचेरु ७ किमी रस्ता (खडीकरण व डांबरीकरण) किंमत ४ कोटी ६१ लक्ष, दानशूर चौक ते आजाद चौक सिमेंट रस्ता व नाली ६५ लक्ष, बाजारवाडी मध्ये मटण मार्केट ओटे बांधकाम २५ लक्ष याशिवाय विविध प्रभागातील अनेक विकासकामांचा शुभारंभ काल करण्यात आले.

 या भूमिपूजन कार्यक्रमादरम्यान ना.आत्राम यांनी अनेक घरात सदिच्छा भेट दिली व त्यांच्याशी आस्थेने संवाद साधला, अनेक प्रभागात असलेल्या समस्या जनतेकडून जाणून घेतल्या व त्या तात्काळ सोडविण्याच्या सूचना नगराध्यक्षा व मुख्याधिकारी यांना दिले.

     यावेळी अहेरीचे नगराध्यक्षा हर्षाताई ठाकरे, मुख्याधिकारी दिक्षांत देशपांडे, उपाध्यक्ष कमलताई पडगेलवार, जेष्ठ नेते प्रकाश सावकार गुडेल्लीवार, नगरसेवक नारायण सिडाम, श्रीनिवास चटारे, मालुताई तोडसाम, प्राजक्ता पेद्दापल्लीवार, स्मिता येमुलवार, गिरीष मद्देलौवार, दामाजी सिडाम, रमेश समुद्रालवार, पप्पु मद्दीवार, अमोल गुडेल्लीवार, सचिन पेद्दापल्लीवार, शंकर मगडीवार, सरफराज आलम, दिलीप पडगेलवार, संतोष येमुलवार, दिनेश येनगंठीवार, सचिन एरोजवार, पौर्णिमा इष्टम, रहिमा सिद्दिकी, श्रीकांत नामनवार, ललित गिरोले, निसार भाई सह भाजपा कार्यकर्ते तसेच नगर पंचायत कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!