सहाव्या दिवशीही शाळा बंद, प्रशासन कुंभकर्णि झोपेत....

सहाव्या दिवशीही शाळा बंद, प्रशासन कुंभकर्णि झोपेत....

41 विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात...
 सोमवारला काढणार सर्व विद्यार्थ्यांच्या टी.सी.


शंकरपूर (जगदीश पेंदाम)
                          येथून जवळच असलेल्या खैरी येथे जिल्हा परिषद उच्य प्राथमिक शाळा आहे. यात एक तें सात वर्ग असून शाळेत एकूण 41 विद्यार्थी आहेत. परंतु जो पर्यंत येथील शिक्षक मंजिल शेख यांना निलंबित करणार नाही तो पर्यंत आम्ही आमची मुले शाळेत पाठवणार नाही असा निर्णय येथील पालक व शाळा व्यवस्थापण समिति ने मागील सोमवार दि. 16/09/2019 ला घेतला होता आजपर्यंत त्यांचेवर कोणती प्रकारची कार्यवाही झालेली नाही म्हणून येत्या सोमवारी आम्ही सर्व पालक आमच्या मुलांच्या टी सी काढून दुसऱ्या शाळेत टाकू असा इशारा येथील पालकांनी व शाळा व्यवस्थासमितीने दिला आहे.
 मंजिल शेख हे शिक्षक नेहमी दारू पिऊन शाळेमध्ये येत असतात महिन्यातून दहा ते बारा दिवस शाळेतच येत नाही, जुलै महिन्यामध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला त्या दिवसापासून सतत 48दिवस गैरहजर होते त्यांनी असा कोणत्याही सुट्टीचा अर्ज शाळेतील मुख्याध्यापक याना दिला नसुन याबाबत मुख्याध्यापक यानी शेख ला विचारणा केली असता मुख्याध्यापकाला दारूचा नशेत अश्लील भाषेत शिवीगाळ करून माझी कुणी काहीही करू शकत नाही असे बोलतात. व शाळेतील विद्यार्थ्यांना शिकत असताना मुलांना मारहाण करणे, चिंमट्या घेणे, व हात, पाय, दाबून मागणे या पद्धतीची वागनुक ते शाळेमध्ये करत असतात. शाळेतून बाहेर जाताना मुख्याध्यापकाला माहिती न देता मस्टरवर सही करून शाळेतून गैरहजर राहण्याचे प्रकार त्यांनी केली आहे एवढेच नाही तर शाळेतल्या कोणताही कार्यक्रम  ते दांडी मारत असतात..

गावातील नागरिक तत्कालीन शाळा समितीचे अध्यक्ष फालके व तत्कालीन मुख्याध्यापक यांनी वरिष्ठांकडे या तक्रार वारंवार वरिष्ठांना  शिक्षकाची तक्रार केली होती तरीसुद्धा त्यावेळी सुद्धा दुर्लक्ष केले गेले...सन 2016 ते 2019 पर्यन्त या शिक्षकाच्या बऱ्याच तक्रारी शिक्षण विभागाकडे केल्या गेले  परंतु त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची आज पर्यंत कारवाई करण्यात आली नसल्याने पालकांनी व शाळा समिती पदाधिकाऱ्यांनी येथे सोमवारी टी,सी, काढण्याचा निर्णय व आपल्या पदाचा राजीनामा देण्याचे निर्णय घेतला असून अधिकाऱ्यांचे मिली भगत असल्याने कारवाई केली गेली नाही असे मत नवनाथ  खाटे, वसंत नरुले ,संतोष नांदेकर, ज्योती फाले, हर्षा पिपरे, प्रिया लटारे व पालकाकडून बोलले जात आहे..

पर्यायी व्यवस्था.. मुलांचे भविष्याच्या विचार करून गावातील नागरिकांनी पर्यायी शिक्षण व्यवस्था गुरुदेव सेवा मंडळ येथे करण्यात आली असून  कविता गजेंद्र पिपरे, व शुभांगी संदीप सोनटक्के, सुशिक्षित महिला मुलांना गुरुदेव मंडळाच्या आवारामध्ये शिक्षण देत आहे..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!