सेंट अॅन्स हायस्कूलच्या सागर सामंत व विभास वाळकेचे सुयश

गोळाफेक व थाळीफेक स्पर्धेत विभागीय स्तरावर निवड

मूल (अमित  राऊत ) सेंट अॅन्स हायस्कूल मूल येथील वर्ग ८वीचे विद्यार्थी सागर शक्ती सामंत याने १४ वर्षांखालील जिल्हास्तरीय गोळाफेक स्पर्धेत तर विभास नागेश वाळके याने थाळीफेक स्पर्धेत बाजी मारली असून दोघांचीही नागपूर विभागीय स्तरावर निवड झाली आहे.


    सागर व विभासने आपल्या यशाचे श्रेय आपले आई-वडील, शाळेच्या मुख्याध्यापिका रेव्ह.सिस्टर शॅलेट सॅबास्टियन, क्रिडाशिक्षक आंबोणे सर,ज्योती चटारे,श्र्वेता वाळके यांना दिले असून त्याचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!