तळोधी नाईक येथे तान्हा पोळा मोठ्या उत्साहात संपन्न

तळोधी नाईक येथे तान्हा पोळा मोठ्या उत्साहात संपन्न


विविध प्रकारची बक्षिस बाल गोपालांना वाटप


चिमूर - प्रतिनिधि ( विलास मोहिनकर )


चिमूर : - १ सप्टेंबर रोजी  चिमूर तालुक्यातील तळोधी नाईक येथे एकता नाट्य कला मंडळ च्या वतीने तान्हा पोळा उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते त्यात गावातील बाल गोपालानी आप आपले नंदी बैल सजवून सुभाष चौक तळोधी येथे आणून स्पर्धेत भाग घेवून विविध बक्षीसे पटकाविली त्यात विविध बक्षिसाची मेजवानी होती २ सायकल, ५ मिक्सर,सहभागी सर्व स्पर्धकाना स्कूल बैग चिमूर विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार किर्तिकुमार उर्फ बंटीभाऊ भाँगड़िया यांचे कडून प्रायोजित करण्यात आली होती तसेच ३ स्टडी टेबल प्रदीप बंडे सामाजिक कार्यकर्ता चिमूर यांचे कडून, ३ स्टडी टेबल श्रद्धाताई प्रदीपजी बंडे नगरसेविकास चिमूर यांचे कडून सिलिंग फैन तळोधी चे सामाजिक कार्यकर्ते नामदेव गजभे यांचे कडून,कूकर तळोधी चे युवा उद्योजक सुनील समर्थ यांचे कडून,२ फायबर खुर्ची इमरान कुरेशी सामाजिक कार्यकर्ते चिमूर यांचे कडून,२ फायबर खुर्ची प्रशांत ठावरी आदिवासी विविध कार्यकारी संस्था मासळ यांचे कडून,१ फायबर खुर्ची प्रा. राजुभाऊ दांडेकर यांचे कडून,१ स्टडी टेबल कपिल ओमप्रकाश गनोरकर युवा कार्यकर्ते भाजपा टेकेपार यांचेकडून आयोजित करण्यात आले होते.या प्रसंगी बक्षीस वितरण कार्यक्रमात तळोधी नाईक चे उपसरपंच तथा कृषी उत्पन्न बाजार समिति चिमूर संचालक कलीम शेख,एकता नाट्य कला मंडळ चे अध्यक्ष नामदेव नंनावरे, पोलिस पाटिल रामप्रभु नागदेवते,सामाजिक कार्यकर्ते इमरान कुरेशी,तंटामुक्त गांव समिति अध्यक्ष शकील शेख,रमेश भोयर,सुनील समर्थ,दशरथ खाटे आदि मान्यवर उपस्थित होते तर सर्व नंदी बैल चे निरीक्षण वनरक्षक अनकाडे, चिमूर नगर परिषद चे हेमंत राहुलवार यांनी केले
एकता नाट्य कला मंडळ तळोधी नाईक च्या वतीने मागील वर्षिपासून तान्हा पोळा उत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे त्यामुळे गावात आनंदाचे वातावरण असून गावातील महिला भगिनी व पुरूष मंडळी मोठ्या संखेनि उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता एकता नाट्य कला मंडळाचे सलीम शेख, विश्वास मेश्राम, नितेश भोयर,अनिल समर्थ,शफीक शेख,राजू मेश्राम,सौरभ भोयर,सचिन कावरे,गजानन नंनावरे,अमोल कुकडे, सुरेंद्र पोहनकर, सुनील मेश्राम आदि कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!