आनंद निकेतन कृषि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी केले कृषि विषयी उपक्रम
आनंद निकेतन कृषि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी केले कृषि विषयी उपक्रम
बिजोनि गावात कृषी विषयक केलेले उपक्रम गावकऱ्यांच्या सहवासाने झाले यशस्वी
वरोरा - प्रतिनिधी ( आलेख रट्टे )
वरोरा : - ग्रामीण कृषि कार्यानुभव अंतर्गत आनंद निकेतन कृषि महाविद्यालय वरोरा येथील विद्यार्थ्यांमार्फत कृषि विषयक उपक्रम राबविण्यात आले. बिजोणी येथे आनंद निकेतन कृषि महाविद्यालय वरोरा येथील ग्रामीण कृषि कार्यानुभव अंतर्गत गावात आलेल्या विद्यार्थ्या मार्फत कृषि विषयक विविध कार्यक्रम राबविण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने गुलाबी बोंड अळीचे यशस्वी नियंत्रण व व्यवस्थापन आणि किटकनाशक फवारणी दरम्यान घ्यावयाची काळजी हे उपक्रम होते. या व्यतिरिक्त कृषि विषयक विविध विषयांवर विद्यार्थ्यां मार्फत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. हा उपक्रम यशस्वी रित्या पार पाडण्यात गावातील सरपंच सौ नंदाताई आत्राम , गावाचे पोलिस पाटील श्री राहुल धांडे a ग्रामसेवक एच बी इनामे साहेब यांचे विशेष सहकार्य लाभले, असे विद्यार्थ्यांनी सांगितले. विद्यार्थ्या मधे कु. अनिकेत धांडे, कू दुर्गेश नरवाडे, कू शिशिर भोयर, कू निशांत तलमले आणि कू अमित दिनकर यांचा सहभाग होता.
विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाचे श्रेय गावातील शेतकरी, गावकरी यांना दिले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!