पट्टेदार वाघाने केली म्हशीची सिकार मालेवाडा - जांभुळघाट परीसरात वाघाची दहशत

पट्टेदार वाघाने केली म्हशीची सिकार

मालेवाडा - जांभुळघाट परीसरात वाघाची दहशत 


जांभुळघाट - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )


जांभूळघाट : - मालेवाडा येथिल रघुवीर शत्रूगण जिवतोडे हे आपल्या शेतालगत म्हशीला चराई करीत असताना रविवारला  सायंकाळी ०५:३० वाजता वाघा ने अचानक हमल्ला करून जागेवरच म्हशीला ठार केले. आरडा - ओरड केल्याने तीथुन वाघ बाजुला निघून गेला. त्या नंतर वनविभागाला याची माहीती दिली असता,वनपाल लोखंडे व  वनरक्षक भैसारे यांनी चौकसी करून तात्काळ कॅमेरा लावण्यात आले. मालेवाडा - जांभुळघाट परीसरात वाघाचे दर्शन होत असल्याने या परीसरात दहशती चे वातावरन निर्माण झाले आहे. कधी डूकराचे हल्ले,तर कथी वाघाचे हमल्ले होत असतात. या जंगली प्राण्यामुळे शेतकरी व गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागानी वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावी अशी गावकऱ्यांची मांगणी होत आहे. आणि वनविभागाने तात्काल याचा पंचनामा करून आर्थिक मदत शेतकऱ्याला देण्यात यावी अशी जनतेची मागणी आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!