रत्नापुर मधे दारुबंदीसाठी एकवटल्या असंख्य महिला मंडळी

रत्नापुर मधे दारुबंदीसाठी एकवटल्या असंख्य महिला मंडळी


नवरगाव (अमोल निनावे)                      
अनेक वर्षापासून दारू बंदी झाली मात्र आजही मोठ्या प्रमाणात दारू चंद्रपुर जिल्ह्यात सुरु आहे.त्यासाठी अनेक गावातील महिला एकत्रित होऊन दारुबंदी साठी पुढाकार घेताना आढळून येत आहेत.                   


 नवरगाव मधे मोठ्या प्रमाणात दारू या एका वर्षाच्या अगोदर प्राप्त व्हायची मात्र जेव्हापासून सामाजिक युवा ब्रिगेड संघठना निर्माण झाली तेव्हापासून दारुचे महापुर बंद झाले.त्यामुळे आता दारू पिणारे आंबट शौकीन आपला मोर्चा रत्नापुर,नैनपुर या सारख्या नवरगावला लागून असलेल्या ठिकाणी वळविला आहे. त्यामुळे रत्नापुर मधील बहुसंख्य महिला मंडळी यांनी आज एक मोठी सभा आयोजित करुण दारू बंदी विषयावर्ती मार्गदर्शन व् दारू बंदी महिलांची वार्डवाहिज समिति बनवण्यात आली.या सभेचे अध्यक्ष सिंदेवाहि पोलिस स्टेशनचे ठानेदार श्री. निशिकांत रामटेके, प्रमुख पाहुणे पोलिस उपनिरीक्षक नेरकर सर,सामाजिक युवा ब्रिगेड संघठनेचे प्रमुख श्री अमोल निनावे,तसेच रत्नापुरचे माजी जिल्हा उपाध्यक्ष सौ कल्पना बोरकर,रत्नापुरचे पोलिस पाटिल श्री नरेंद्र गहाने,तसेच अनेक मान्यवर व् मोठ्या प्रमाणात रत्नापुरच्या महिला मंडळी उपस्थित होत्या.या सभेमधे सर्वानुमाते रत्नापुरची दारू बंद झाली पाहिजे असे अनेक महिलांच्या मुखातून निघत होते.अनेक लोकांचा संसार या दारू मुळे बुड़ाला असे अनेक समश्यानवर्ती विचार मंथन झाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!