गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा संपन्न.

गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा संपन्न.


सावली (प्रतिनिधी)
महाराष्ट्र अर्बन को आॅप पतसंस्थेच्या ६व्या वर्धापन दिनानिमित्त संपूर्ण सावली तालुक्यात इयत्ता १०वी व १२वी परिक्षेत गुणानुक़मे  गुणवंत ठरलेल्या गुणवंतांचा सत्कार सोहळा संपन्न झाला.
               या दुहेरी समारंभाचे उद्घाटन जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक संदीप पाटील गडडमवार, म.रा.मराठी पत्रकार संघाचे पुवं विदर्भ अध्यक्ष महेप्रा. महेश पानसे, सावली चे नगराध्यक्ष विलास भाऊ यासलवार यांनी केले.
                तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा शाल, पुष्पगुच्छ ,सन्मानचिन्ह व रोख निधी देवून उपस्थित मान्यवरांचे हस्ते कौतुक करण्यात आले.पालकाचासुद्धा यावेळी सत्कार करण्यात आला.
               पतसंस्थेच्या ६व्या वर्धापन दिनानिमित्त व्यवस्थापक
सुरज बोम्मावार यांनी पतसंस्थेच्या प़गतिचा आलेख पुढे 
ठेवला.
          या प़संगी पतसंस्थेच्या विवीध कल्याणकारी योजनांचा सुभारंभ मान्यवरांचे हस्ते करण्यात आला.
          याप़संगी उपस्थित मान्यवरांनी गुणवंत विद्यार्थ्यांना
मोलाचे मार्गदर्शन करुन त्यांना 
स्पधैच्या युगात यशस्वी होण्यासाठी कानमंत्र दिला.
              सदर पतसंस्थेच्या पारदर्शक व्यवहार व गत ५वषा॔तिल प़गतीबद्धल सर्व उपस्थित मान्यवरांनी व सभासदांनी संचालक मंडळाचे
अभिनंदन केले.
   या सोहळ्याला तालुक्यातील गुणवंत विद्यार्थी,पालक, महाविद्यालयांचे प़ाचाय॔,शिक्षक, पतसंस्थेचे ग़ाहक, सदस्य, संचालक, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!