चिमूर शहरातील राजीव गांधी नगरीत तान्हा पोळा मोठया उत्साहात संपन्न

चिमूर शहरातील राजीव गांधी नगरीत तान्हा पोळा मोठया उत्साहात संपन्न


चिमुकल्यांची चांगलीच गर्दी

बिस्कुट चॉकलेट देऊन तोंड केले गोड 


चिमूर - प्रतिनिधी ( विलास मोहिनकर )


चिमूर : - श्रावण महिन्याच्या शेवट व भाद्रपद माहीनेच्या प्रथमेला पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी लहान मुलांचा तान्हापोळा हा सन मोठ्या उत्सहाने साजरा केला जातो. याच सना निमित्ताने  राजीव गांधी नगरीतील व चिमूर शहरातील शेकडो च्या संख्येने चिमुकले नटून थटून वेशभूषा धारण करून मोठ्या उत्सहाने या तान्या पोळ्यात सहभागी झाले अध्यक्ष प्रदीप बंडे सामाजिक कार्यकर्ते होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून गुलाबरावजी फरकाडे,प्रभाकरजी ठुने,मांढरे साहेब, कुबडे पाटील, प्रवीण घ्यार, रेखाताई मालोदे,उषाताई हिवरकर होत्या या मध्ये सहभाग घेतलेल्या चिमुकल्यांना भेट वस्तु व रोख रक्कम देऊन पुरस्कृत करण्यात आले तसेच बाल - गोपालांना बिस्कुट - चॉकलेट  देऊन त्यांचे तोंड गोड करण्यात आले.बालपणापासून शेतकरी जीवनाचे प्रतिबिंब उमटावे व शेतकरी बाधवांनमध्ये एकता निर्मान व्हावी हा प्रमुखं उद्देश आहे. यात ४०० बाल  गोपालांनी नंदी बैल घेऊन स्वतः शेतकरी, राधा, कृष्णा, भगवान  शंकर, वारकरी अशा विविध प्रकारच्या वेशभूषया धारण करून तान्हा पोळ्यात सहभागी झाले. संपूर्ण राजीव गांधी नगरातील जय माँ दुर्गा भवानी मंदिर जवळ एकत्र होऊन प्रमुखं  अतिथि च्या  हस्ते पूजन करून  नगरातील पारंपरिक व आधुनिक झडत्या म्हणून त्या कला वधीत निरिक्षकांनी नंदी  बैलाचे निरीक्षण व परीक्षण केले.  या मध्ये उत्कृस्ट सजावट असलेला नंदी , विना सजावट असलेला नंदी , वेशभूषा  ,  संदेश  अशी ४ बक्षिसे देण्यात आली आदी नंदी बैलाला भेट वस्तु  पुरुस्कृत करण्यात आले. तसेच उर्वरित  सर्व नंदी बैलाला घेऊन येणार्‍या  बालगोपालांना  बिस्कुट  पाकीट  देऊन त्यांचा तोंड गोड करण्यात  आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष योगेश ठुने , प्राध्यापक कसारे सर, दिपक तिवाडे सर , बंडू हिवरकर , विलास कोहचाडे , गुणवंत मांडवकर , संजय भरडे , शेखर येकोणकर , राकेश मांढरे , पिंटू भरडे , रामभाऊ करारे , मेघशाम जिकार , सूरज पचारे , मंगेश घ्यार , रामभाऊ दुधनकर , राजू कारेकार , जबिर कुरेशी , पत्रकार, रामदास ठुसे व विलास मोहिनकर ,व शहरातील तसेच वार्डातील महिला व पुरूष मोठ्या  संख्येने  उपस्थिती होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!