शिक्षका च्या निलंबनसाठी शाळा बंद
शिक्षका च्या निलंबनसाठी शाळा बंद
शिक्षका च्या भीतीने पालक काढत आहे tc
शंकरपूर (जगदीश पेंदाम)
येथून जवळ असलेल्या खैरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पालकांनी बँद केली असून जो पर्यंत शिक्षका ला निलंबित करण्यात येणार नाही तो पर्यंत मुलं शाळेत न पाठविण्याचा निर्णय पालकांनी केले आहे
या शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत असलेले मंजिल शेख हे शाळेत दारू पिऊन विद्यार्थ्यांशी असभ्य वर्तन करीत आहे विध्यार्थ्यांना अश्लिल शब्दात शिवीगाड करून त्यांच्या पोटाला चिमटे घेणे मारहाण करणे असे प्रकार करीत असल्याचा आरोप पालकांनी केला आहे विध्यार्थी त्या शिक्षकाच्या दहशतीत असल्याने पालक विद्यार्थ्यांनच्या tc काढत आहे याशिवाय हे शिक्षक मुख्याध्यापक व सहायक शिक्षका सोबतही गैरवर्तन करीत आहे मुख्याध्यापक सेलोरे यांना काही कारवाही केल्यास फोन वरून मारण्याची धमकी देऊन अश्लिल शब्दात शिवीगाड केली आहे..
या संदर्भात मागील तीन वर्षांपासून तत्कालीन मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन समिती नि सुद्धा तक्रार दिली परंतु कोणतीच कारवाई झाली नाही यावेळेही मुख्याध्यापक व व्यवस्थापन समिती नि पंचायत समिती व जिल्हा परिषद शिक्षण विभागाचे कडे तक्रार दाखल केली परंतु त्या तक्रारीची दखल न घेतल्यामुळे पालकांनी जो पर्यंत त्या शिक्षकाला निलंबित करण्यात येणार नाही तोपर्यंत आपले मूल शाळेत न पाठविण्याचा निर्णय घेतला आहे..
या प्रकरणा ची चोकशी करण्यात आली असून अहवाल शिक्षण विभाग चंद्रपूर कडे पाठविला आहे त्यांच्या आदेशानुसार पुढील कारवाही करण्यात येणार आहे...
किशोर पिसे
गटशिक्षणाधिकारी चिमूर



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!