शंकरपूर वासियातर्फे पूरग्रस्तां करीता काढली मदत रॅली

शंकरपूर वासियातर्फे पूरग्रस्तां करीता काढली मदत रॅली


शंकरपूर (जगदीश पेंदाम)
  येथील गावातील सार्वजनिक सर्वच मंडळाच्या तसेच गावातील नागरिकांच्या वतीने  पूरग्रस्तांसाठी आर्थिक मदत रॅली काढण्यात आली...
 
 कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यात पुराणे थैमान घातले होते त्यात तेथील जीवन अस्ताव्यस्त झाले  त्यामुळे तेथील जनतेला मदत व्हावी या मानवीय दृष्टिकोनातून गावातील वार्ड वार्ड मधून रॅली काढण्यात आली.
 संपूर्ण गावातून काढण्यात आलेल्या रॅलीमधुन गावकऱ्यांना मदतीचे आव्हान करण्यात आले होते.
 गावकरी तसेच व्यापारी युवकांनी आर्थिक मदत दिली या सोबतच विकास विद्यालय व राजीव गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी खाऊचे पैसे ही आर्थिक मदत म्हणून  विद्यार्थ्यांकडुन देण्यात आली. या उपक्रमांमध्ये तेवीस हजार सातशे रुपये जमा झाले असून ते एम मुख्यमंत्री सहायता निधी मधे जमा करण्यात आली.
 
डॉ नवाज शेख यांची सहहृद्यता
 येथील डॉ नवाज शेख हे दरवर्षी  बकरी ईद चां सण मोठ्या उत्साहात साजरा करतात परंतु या वर्षी कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यात पुराणे थैमान घातले होते त्यामुळे तेथील जनतेला मदत व्हावी या उद्देशाने त्यांनी बकरी ईद चां सण साजरा न करता त्या उत्सवाला लागणारे पैसे त्यांनी पूरग्रस्तांना दिले आहे.

 त्यांनी पूरग्रस्तांसाठी पाच हजार रुपयां ची आर्थिक मदत दिली 
 या पूरग्रस्तांच्या मदत रॅली उपक्रमांमध्ये
योगेश रासेकर, शुभम रासेकर, जयेश चौधरी, आकाश हजारे, घनश्याम रासेकर, अमित तायवाडे, अतुल रासेकर, सलमान शेख, गजू कापसे, इम्तियाज, शेख संतोष कोरडे, प्रज्वल सूर्यवंशी, लोकश कावडे, कपिल बघेल, आशिष चौधरी, डॉ नवाज शेख, युवराज मुरस्कर, मोरेश्वर पांगुळ, वीरेंद्र हिंगे ,आमोद गौरकर आदी युवक सहभागी झाले होते..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!