नेहरू युवा केंद्राचे विविध उपक्रम
नेहरू युवा केंद्राचे विविध उपक्रम
शंकरपूर (जगदीश पेंदाम)
येथील नेहरू युवा केंद्राच्या शाखेने विविध उपक्रम राबवून जनजागृती करण्यात आली.
नेहरू युवा केंद्र व खेल मंत्रालय भारत सरकार अंतर्गत नेहरू विद्यालय तसेच गावातील अंगणवाडी येथे स्वछता अभियान राबविण्यात आले विद्यार्थ्यांची रॅली काढून जनजागृती करण्यात आली.
समारोपीय कार्यक्रमात विद्यार्थ्याना स्वछतेची शपथ देण्यात आली
तसेच येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात स्तनपान सप्ताह साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी सरपंच दीक्षा भगत, वैद्यकीय अधिकारी डॉ घोनमोडे, नेहरू विद्यालयाच्या मुख्याध्यापिका तरारे, नेहरू युवा केंद्राचे समन्वयक रामेश्वर सहारे, स्वयंसेविका मयुरी काळमेघे उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी आशिष कोसरे, आदेश खोब्रागडे, हाकेश्वर सहारे, भाग्यश्री सहारे आदींनी परिश्रम घेतले..



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!